मनसे बैठक,, बीड,, मराठवाडा,,,
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल्ह्याची बैठक बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली,, यावेळी येणाऱ्या निवडणुका, पक्ष संघटन, शाखा बांधणी आणि मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून ,पंचनामे न करता तात्काळ मदत देण्यात यावी या विषयी संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे या विषयावर चर्चा झाली,,यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, उपाध्यक्ष अशोक तावरे,बीड चे चारही जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे,वैभव काकडे, राजेंद्र मोटे, महिला जिल्हा अध्यक्ष वर्षाताई जगदाळे ,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्तीत होते,,
यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी महालक्ष्मी चौक येथे उपशहर करण लोंढे यांनी उभारलेल्या मनसे ध्वज स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले,,