Chopda

अडावद आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिराचा प्रारंभ…..

अडावद आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिराचा प्रारंभ…..

चोपडा : जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. जमादार, तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

शस्त्रक्रियेकरिता.
अडावद तथा परिसरातील वटार,सुटकार,वडगांव, वर्डी, चांदसनी, मंगरूळ आदी भागातील तसेच माहेरवाशिणी यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा एकुण 10 महिलांनी फायदा घेतला.

अनेक दिवसापासून कोरोनाचा काळ सुरू असल्याकारणाने, अडावद आरोग्य केंद्रातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर बंद होते,
मात्र आत्ता काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप हळुहळु कमी होऊ लागल्यामुळे, तसेच सर्वदूर सर्वच दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने,
अडावद येथील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात करण्यात आली.

आज माता बाल संगोपन अधिकारी-डॉ. समाधान वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून
प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथिल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ..करण्यात आला.
प्रसंगी.. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-डॉ.विष्णुप्रसाद दायमा, आरोग्य सेविका-चंद्रकला चव्हाण,आरोग्य सहाय्यक-प्रकाश पारधी,आरोग्य सेवक-विजय देशमुख,अविनाश चव्हाण, महेंद्र पाटिल, दिनकर वाघ,
आरोग्य सेविका-उज्वला परदेशी, निवेदिता शुक्ल, सुनीता दुधे, आशा धनगर,
परिचर-धुडकू वारडे, भुषण देवराज, बळवंत पुजारी, मनोज चावरे, दिलीप पाटिल आदी सर्वच आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button