रावेर

रावेर मतदारसंघातुन अनिल चौधरी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

आखाडा विधानसभेचा

अनिल चौधरी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रावेर विधानसभा मतदारसंघातून शक्ति प्रदर्शनात झाला दाखल. ..

प्रतिनिधी विलास ताठे

अनिल छबिलदास चौधरी, भुसावळ यांनी दि. 4 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 9 . 30 ला छोरीया मार्केट येथून तहसील कार्यालयावर मोठ्या रॅली ने कार्यकर्ते ,समर्थक यांच्यासह अनिल चौधरी, यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यामुळे रावेर विधानसभा मतदारसंघात चांगलीच खळबळ उडाली आहे, कारण अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, यावेळेस होणारी गर्दी ही भाजप व काॅग्रेस ला धडकी नक्कीच ठरेल असे. अनिल चौधरी, यांनी म्हटले होते , तसेच आज दुपारी घडले ही व्यासपीठावर संतोष चौधरी, माजी आमदार भुसावळ, दिलीप बंजारा पाल, गणेश बोरसे, कुरबान शे माजी उपनगराध्यक्ष फैजपूर, पातोंडी, अनिल पाटील, केरहाळा, सिताराम पाटील, दोधे, युवराज कराळ, शितल पाटील, माजी नगराध्यक्ष रावेर, संजय चौधरी, सावदा, धनराज चौधरी, सचिन चौधरी, मोहम्मद शफी, दिनकर पाटील रोझोदा, उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष भुसावळ, सुधीर पाटील, माजी उपनगराध्यक्ष,ॲड सुरज चौधरी, रावेर, पंकज वाघ, संतोष चौधरी,
शे.सादीक रावेर नगरसेवक. रविंद्र महाजन, सावखेडा.
सचिन चौधरी, निभोरा सागर चौधरी, गुणवंत नीळ बामणोद
जगन येवले, कुंभारखेडा,सह अनेक मान्यवर उपस्थित होते, यावेळी अनिल चौधरी यांनी थोडक्यात सभेला संबोधित केले. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे दोन वर्षे सतत रावेर यावल तालुक्यातील संपर्कातून हि भली मोठी आपली उपस्थितीत हिच आता परिवर्तनाची नांदी आहे, तसेच रावेर यावल तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी तरूणांच्या भल्यासाठी माझी अपक्ष उमेदवारी म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की, किमान मला विजयी करण्यासाठी आपले अनमोल मत मला तुम्ही नक्कीच देणार अशी ग्वाही आपल्या मोठ्या प्रमाणावर उपस्थितीतून मला आशा वाटते आहे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button