रावेर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न..
फैजपूर — सलीम पिंजारी
यावल रावेर तालुक्यातील भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी,शेतीपूरक उद्योग, तरुणांना रोजगार तसेच महिला सबलीकरण व आदिवासी ,अल्पसंख्याक या घटकांच्या हितासाठी आपण काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
आज रावेर येथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी रावेर येथील आठवडे बाजार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेशदादा चौधरी हे होते यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सर्वप्रथम रावेर- यावल तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीत योगदान देणारे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी,सहकार महर्षी जे टी महाजन, बळीराम बापू वाघूळदे, काकासाहेब राणे,भाऊसाहेब बोनडे, बाजीराव नाना पाटील, विश्वनाथ वामन पाटील, घ.का.पाटील ,सुमनताई पाटील,मनोहर लहू पाटील , पी वाय चौधरी, उखाभाई वासना, डिंगबर शेठ नारखेडे, गिरीधर शेठ भंगाळे, रामकृष्ण सिताराम पाटील, वजीर भाई तडवी, अब्बास भाई जमादार, दुलबा पाटील,विश्वनाथ शेठ चौधरी, त्र्यंबक श्यामजी चौधरी, निंबा दुला चौधरी अशा अनेक मान्यवरांचे स्मरण करून अभिवादन केले.
भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात मोठ मोठ्या गप्पा मारून लोकांना संभ्रमात टाकले अशी भाजपा सरकारवर तोफ डागली प्रत्येक्ष कृती केली नाही असेही यावेळी आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ईडी चौकशीत गोवण्याचा निंदनीय प्रकार केला त्याचा शिरीष दादा चौधरी यांनी यावेळी निषेध केला व सांगितले की अवघा महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठीशी उभा आहे दरम्यान बाळासाहेबांनी या भागात धरणे करून आबादाणी केले हा वसा घेऊन आपण यावल व रावेर तालुक्यातील गेल्या चार वर्षासपासून खालावलेली भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, गावागावात तरुणांना रोजगार निर्मिती,शेतकऱ्यांचे हित जोपासून आदिवासी व महिला सबलीकरण, अल्पसंख्याकांच्या हितासाठी आपण काम करणार आहे त्यासाठी रावेर मतदार संघाच्या विकासाचे काम करण्यासाठी मला आशीर्वाद रुपी मत देऊन संधी द्या या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील म्हणाले गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारने घोषणा करण्याचा पाऊस लावला आहे देशात आर्थिक मंदी झाली आहे हे सरकार निष्क्रिय ठरले असून घराघरात पोहचून शिरीष दादा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले माजी खा डॉ उल्हास पाटील यांनीही भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा पाढा वाचत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही,बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे तसेच देश स्वातंत्र्यासाठी योगदान दिले अशा चौधरी कुटुंबातील तिसरे वंशज व आपल्या हक्काचे उमेदवार शिरीष दादा चौधरी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
माजी आमदार अरुण पाटील म्हणाले राजकीय वारसा व सुसंस्कृत घराण्यातील उन्नत व आपल्या हक्काचा उमेदवार शिरीष दादा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची त्यांनी ग्वाही दिली राजीव पाटील म्हणले विकासाची दृष्टी असलेला व सर्वसामान्यांचा कणव असलेला नेता शिरीष दादा आहे त्यामुळे असाच त्यांच्या सारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठविला पाहीजे त्यासाठी आपण सर्वांनी शिरीष दादा चौधरी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे यानंतर रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी आपण व आपले समर्थक कार्यकर्ते शिरीष दादांसोबत असल्याची ग्वाही दिली आदिवासी नेते हमीद भायखा तडवी,एडव्हॉकेट एम ए खान, यांनीही मनोगतातून शिरीष दादांना निवडून आणण्याचे आवाहन केले







