Pandharpur

पंढरपुरात आषाढी वारीसाठी १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी

पंढरपुरात आषाढी वारीसाठी १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपुरात होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कलम १४४ च्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात येणार आहे. १७ ते २५ जुलै या काळात पंढरपुरात कलम १४४ लागू राहणार आहे. परवानगी नसलेल्या भाविकाला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांना पंढरपूर यात्रेला जाता येणार नाही. २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. मात्र प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै असे नऊ दिवस पंढरपुरात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी पंढरपूर आणि आजूबाजूच्या दहा गावात लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या प्रस्तावाला आता शासनाने हिरवा कंदील दिला आहे. पंढरपूरात गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे चंद्रभागा नदीच्या परिसरात संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना शासनाने परवानगी दिली आहे त्याच लोकांना पाच दिवस पंढरपुरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या दहा गावात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button