वय 52 वर्षे वयाच्या स्त्रीने 06 तास मृत्यूशी झुंज दिल्यावर पंढरपूर मधील कोळी बांधवांनी तिचे वाचवले प्राण
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : काल दिनांक 20/06/2021 रोजी रात्री 01.00 वा मोटर सायकल वरून दगडी पुलावरून शेतामध्ये पाणी द्यायला जात असताना अचानक एका स्त्रीचा ओरडले ला आवाज येऊ लागला मी भीत भीत गाडी थांबवली परंतु नेमका आवाज कुठून येत होता हे लक्षात येत नव्हते त्यानंतर मी पुन्हा थोडे पुढे जाऊन माझा मित्र किरण यास फोन करून बोलून घेतले त्यानंतर आम्ही दोघांनी आवाज कुठून याचं येत आहे याचा शोध घेतला तेव्हा आम्हाला दगडी पुलाला धरून बसलेल्या एका स्त्रीचा आवाज आला तिच्या जवळ जायला भीती वाटत होती परंतु काळजावर दगड ठेवून आपण मनुष्य असल्याचं कर्तव्य निभावत घाबरत घाबरत तिच्या जवळ पुलावरून गेलो मोबाईल असलेली बॅटरी लावून बघितल्यावर ती बाई एकदमच म्हणाले की मला वाचवा त्यावेळेला आम्ही कोणताही विचार न करता माझ्या सर्व मित्रांना बोलावून घेतलं आणि आणि सर्वांच्या साहाय्याने तिला वर काढले त्यानंतर आम्ही तिला तुम्ही पाण्यात कसे पडला असे विचारले त्या वेळा तिने सांगितले की मी सायंकाळी सात वाजता पाण्यात पडली आहे मी किती आवाज देत होते परंतु मला कोणी वाचवायला आलं नाही आज तुम्हीच माझा विठ्ठल आहात देव म्हणून तुम्हीच माझा जीव वाचवला या पांडुरंगाचे आभार मी कधीही विसरू शकणार नाही.सौ.कांता नारायण भुते वय 52 वर्षे रा.कानगाव तालुका लिंगणघाट जिल्हा वर्धा
कृष्णा नेहत्राव, लालू मंजुळे, अक्षय जाधव, शाहू साठे, दीपक कदम, रोहन कोळी, गोलू जाधव,






