Pandharpur

श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्यावतीने जागतिक योग दिन साजरा

श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्यावतीने जागतिक योग दिन साजरा

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दैनिक पंढरी संचार चे संपादक श्री अनिरुद्ध बडवे यांच्या शुभहस्ते पत्रकार नितिन शिंदे यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल च्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील वाळुजकर यांनी सांगितले की पंढरपूर शहरांमधील नागरिक पत्रकार नोकरदार व व्यापारी या योग प्रेमी योग साधकांनी एकत्रित येऊन सुमारे 15 ते 16 लाख खर्च करून स्वखर्चातून हे योग भवन उभा केले आहे यासाठी आमदार प्रशांतराव परिचारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले सर्व सन्माननीय नगरसेवक अश्विन महाराज मनमाडकर यांच्या सहकार्यातून हे योग भवन उभा केले आहे दररोज या ठिकाणी योग साधक आपली योगसाधना सकाळी सहा ते आठ या वेळेत करत असतात तसेच महिलांसाठी सुद्धा योग वर्ग व झुम्बा डान्स सारखे क्लास चालवली जातात आणि लवकरच या जागेत शहरातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व कराटे प्रेमी यांच्यासाठी लाठी काठी व कराटे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत आगावणे यांनी सांगितले की संस्थेच्या माध्यमातून नुसते योग वर्ग न चालवता सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य बरोबरच वृक्षारोपण व आरोग्य व योग शिबिरे घेतली जातात . संस्थेमार्फत पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे उपक्रम राबवून भाविष्यात जमिनीतील पाणी पातळी वाढविणे कामी मोठी लोकचळवळ उभा करणेचे संस्थेचे उद्दीष्ट आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र कोडग यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी चंदूलाल सुपेकर ,रामलिंग कोष्टी, त्रिभुवन तारे,निस्सार शेख गजेंद्र माने, सर्व योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button