Yawal

?यावल येथील तरुणांची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या।

? यावल येथील तरुणांची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या।
योगेश पवार यावल
यावल : तालुक्यातील मनवेल गावाजवळील दगडी येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, विजय वसंत ठाकरे वय-३५ रा. दगडी मनवेल ता.यावल जि.जळगाव हा तरूण आपल्या आई वडीलांसह पत्नी व दोन मुलींसह राहतो. विजयने आज सकाळी राहत्या घरात कोणीही नसतांना दारूच्या नशेत दोरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.
मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ग्रामीण रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button