Paranda

परंडा येथील सराफ अभिजित पेडगावकर वर खंडणीचा गुन्हा दाखल ब्लॅक मेल करून मागीतली खंडणी

परंडा येथील सराफ अभिजित पेडगावकर वर खंडणीचा गुन्हा दाखल ब्लॅक मेल करून मागीतली खंडणी
परंडा : दै.सामनाचे परंडा वार्ताहर तथा सराफ दुकानदार सुरेश बागडे यांना ५० हजार रूपये दे अन्यथा तुला सोने चोरी प्रकरणाच्या खोटया गुन्हया मध्ये आडकवीन अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या अभिजित हीरालाल पेडगावकर विरुद्ध परंडा पोलिसात दि २२ मे रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी सराफ दुकानदार अभिजीत हिरालाल पेडगावकर ( दहिवाळ) हा दि २० मे रोजी रात्री ७ -३० ते ७-४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश बागडे यांच्या घरी गेला व सोने चोरी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अटक केली होती याची माहिती तुच दिली होती त्या मुळे माझे खुप नुकसान झाले आहे . उत्तर प्रदेश च्या केस मध्ये माझे झालेला सर्व खर्चदे मला अत्ताच्या अत्ता ५० हजार रुपये दे नसता तुलाही सोने चोरीच्या गुन्ह्यात अडकवील व तुझा गेम करीन तुझ्या घरच्यांना देखील माहित पडणार नाही अशी धमकी दिली .
महाराष्ट्रातील च नाही तर बाहेरील राज्यातील मोठ , मोठे गुन्हेगार तसेच पोलिस, मंत्री माझ्या ओळखीचे आहेत सोन्याच्या धंदयामधला मी डॉन आहे तुझा गेम करीन अशी धमकी दिली
दि २० मे रोजी यातील फिर्यादी सुरेश बागडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी अभिजित पेंडगावकर वर भादवी कलम ३८४ , ४५२ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक ससाने हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button