शहीद टिपू सुलतान संघटनेचे शहराध्यक्ष जमीर तांबोळी यांची प्रांत अधिकाऱ्याकडे मागणी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्या मधील व पंढरपूर तालुक्यामधील कोरोना सारख्या रोगाने थैमान घातला असून त्या पार्श्वभूमीवर खाजगी हॉस्पिटल मधील पॉझिटिव रुग्णांकडून दाम दुप्पट रक्कम घेतली जात असल्याची बाब शहीद टिपू सुलतान संघटनेच्या हाती आली कारण पंढरपूर सारख्या लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल व गॅलेक्सी हॉस्पिटल व गणपती हॉस्पिटल येथे रुग्णांची लूट होत असल्याची तक्रार संघटनेच्या हाती आले आहे रुग्णांकडून जास्त रक्कम आकारण्यात येत असल्याने शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार व जीआर प्रमाणे रक्कम आकारण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान युवक संघटना शहराध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केली व पंढरपूर मधील काही सिटी स्कॅन सेंटर च्या तक्रारी पण आले आहेत लाईफलाईन सिटी स्कॅन सेंटर व फॅबटेक सिटी स्कॅन आणि व्यंकटेश सिटी स्कॅन सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांकडून अडीच हजार ते तीन हजार पर्यंत रक्कम आकारण्यात येत असल्याची पण बाब समोर येत आहे आणि कोरोना पॉझिटिव रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावे अशी मागणी शहीद टिपू सुलतान संघटनेच्यावतीने पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
व रुग्णांची लूट नाही थांबल्यास आमर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे






