समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा ग्रामीण भागांमध्ये झंझावती दौरा सुरू
आमदार प्रशांतराव परिचारक यांचे सह महायुतीच्या पदाधिकार्यांची उपस्थिती
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात केली असताना भाजपासह महायुतीचे अधिकृत उमेदवार दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ ही शुक्रवार दिनांक २ एप्रिल रोजी माचनुर येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला. या झंझावाती प्रचार दौऱ्यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचेसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.या प्रचार शुभारंभा नंतर ब्रह्मपुरी, बोराळे, सिद्धापूर, तांडोर,तामदर्डी,रहाटेवाडी,मुंढेवाडी, बठान, उचेठाण, मुढवी, धर्मगाव,
ढवळस,आधी गावातून प्रचार दौरा करण्यात आला.या प्रचार दौऱ्याची सुरुवात शुक्रवार पासून झाली असून शनिवार दिनांक 3एप्रिल रोजी स. ७ वा. अरळी, ८:३० नंदूर, स १० डोणज, भ १०:30 भालेवाडी, दु १ वा .फटेवाडी, दु 3 वा बालाजी नगर, 3.30 कर्जाळ, दु . ४वा कात्राळ, ४:30कागष्ट, सा५ वा डिकसळ, सा .६ वा. तळसंगी, सा .७:30 मरवडे.अशा प्रकारे समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा ग्रामीण मधून प्रचार दौरा सुरुवात झाली आहे.या प्रचार दौरा मधून महायुतीच्या नेत्याकडून हे पोटनिवडणूक आम्ही जिंकूनच दाखवणारअसल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.महा विकास आघाडीच्या कारभारावर टीका करत पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात परिवर्तन घडवून देण्यासाठी ची एक सुरुवात समजली जाणार आहे.त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून समाधान आवताडे हे निवडणूक रिंगणात उभे असले तरीही निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी मात्र या भागातील भाजपा ,रासपा ,आरपीआय (आठवले गट ),रयत क्रांती ,शिवसंग्राम, पदाधिकार्यांसह सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरले आहे.त्यामुळे या निवडणुकीत समाधान आवताडे यांचा विजय निश्चित होणार असल्याचे प्रचारा मधून सांगण्यात येत आहे.






