Pandharpur

पंढरपूर नगपरिषदेच्या वतीने कर वसुली साठी धडक मोहीम १५ थकीत मालमत्ताधारकाचे नळ तोडले

पंढरपूर नगपरिषदेच्या वतीने कर वसुली साठी धडक मोहीम १५ थकीत मालमत्ताधारकाचे नळ तोडले

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगपरिषदेच्या वतीने शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारका कडुन कर वसुली साठी धडक मोहीम हाती घेतली असून नगपरिषदेने या साठी विशेष वसुल पथक तयार केले असुन यासाठी २५ कर्मचारी नियुक्ती केले आहेत.पंढरपूर शहरा मध्ये १९ हजार मालमत्ताधारक असून यातील काही मालमत्ताधारक यांचेकडे १३ कोटी व २२ अधिकृत्य झोपडपट्या मध्ये ६००० झोपडपट्टी धारकअसून यातील अनेक झोपडपट्टी धारक यांच्या कडे 4 ते 5 कोटी रु येणे बाकी आहे या थकीत मालमत्ताधारकाना या पुर्वी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील कलम १५० अन्यवे मागणी बीले देऊन ही २७१३ थकीत मालमत्ता धाराकाने कराची रक्कम न भरल्याने थकीत मालमत्ताधारकाना जप्ती पूर्व सुचना व नळ बंद करण्याची नोटीसा बजवण्यात आल्या होत्या तरी सुद्धा सदर मालमत्ताधारकाने थकीत कराची रक्कम न भरल्याने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाने कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी. पोल फॅक्टरी ३,४३,७१५ रु अधिक्षक दुरवाणी केंद्र पंढरपूर ८,३३,५१०/-नारायण दादा आराध्ये व इतर ७ जण (नळ धारक गर्जे पाटील) ४६,८८४/- भारत हरिबा माने संतपेठ माळी व मराठी लोक वगैरे ११
जण६०,९३५/-संजय हरिभाऊ घोडके वगैरे १८,७८५/-सतिश हणमंतराव बदडे १,२४,२७६/- सुमन शंकर कुंभार ४६,९३४/- प्रसाद प्रकाश कोल्हापूरे२२,७२७/- दत्तात्रय पांडुरंग काळे६५,६५१/- भाऊसो सोपान चौगुले४८,५०७/- सोपान गणपत मोरे २७,७३१/- बजरंग मुरलीधर ताड ६०,०००/- बाबू सिध्दा राऊत १८०००/- पराग रुपलग १९२६३/-एकनाथ देशमाने यांचे नळ तोडण्यात आले
सदरची कारवाई वसुली लिपीक मंगेश परदेशी,सुरेश पवार,विजय ढवळे,पांडुरंग देवमारे,स्वप्निल नेहतराव,आदित्य लोंखडे यांनी केली आहे तरी नागरीकाने आपले थकीत रक्कम भरुन नगपरिषदेस सहकार्य करावे व आपणावर होणारा कटु प्रसंग टाळावा असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button