भाजपा व घटक पक्षांनी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार माऊली हळणवर
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली असून विविध उमेदवार तयारीला लागले आहेत धनगर समाजानेही होळकर वाडा येथे समाजातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बैठक घेतली होती व प्रस्थापित पक्षाकडे उमेदवारी मागावी असे ठरले आहे माऊली हळणवर म्हणाले की पंढरपुर मंगळवेढा मधील काही निवडक समाजबांधवांना घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे व भारतीय जनता पार्टी कडे उमेदवारी मागितली आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रस्थापित घराणेशाही पाहुण्या रावळ्याच राजकारण जपणारा पक्ष असून तो पक्ष बहुजन समाजाला उमेदवारी देणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की सर्वसामान्य कुटुंबातील लढाऊ कार्यकर्त्याला नेहमीच बळ देत आला आहे अनेक बहुजन नेते याच पार्टीमध्ये निर्माण झाले आहेत शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हत्तीच बळ देण्याचे काम पक्षाने केल आहे यामध्ये शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी पाशा पटेल सदाभाऊ खोत रविकांत तुपकर अशा अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षानं बळ दिलेला आहे त्याच पद्धतीचे बळ पंढरपूर मंगळवेढा च्या पोटनिवडणुकीमध्ये माझ्यासारख्या शेतकरी चळवळीत व बहुजन व विशेषता ओबीसी चळवळीत काम करणारा व दलित चळवळीशी सलोख्याचे संबंध असणारा बाराबलुतेदार गोरगरिबांच्या सर्वसामान्य्याच्या प्रश्नावर वरती वेळोवेळी आंदोलन करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारा अनेक वेळा तुरुंगवास भोगणाऱ्या शेताभातल्या कार्यकर्त्यांला उमेदवारी देऊन संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीची मान उंचावण्याचे काम आपण करावं व एक चागंला पार्टीच्या हिताचा मेसेज जाईल व नक्की बहुजन समाज निवडुन देईल अशी विनंती केली यावेळी आमदार पडळकर म्हणाले की वरिष्ठ पातळीवर आपली मागणी लावून धरतो विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे विनंती करतो व भारतीय जनता पार्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघा मध्ये ओबीसी चेहऱ्याच्या शोधात असून वरिष्ठ पातळीवर तशी चर्चाही चालू असल्याचे सांगितले नक्की प्रयत्न करून उमेदवारी मिळवूया असे आश्वासन दिले आहे यावेळी बापूसाहेब मेटकरी धनाजीराव गडदे अंकुश गरंडे हनुमंत शेंडगे अण्णासाहेब उसके राहुल ढेकळे विक्रम तरंगे भैया खरात तकपिरी शेटफळचे बिरूदेव मासाळ बाळासाहेब मेटकरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते






