Pandharpur

निवडणूक आचारसंहिताबाबतची प्रतीक्षा संपली आता लक्ष विविध पक्षाच्या चिन्हांचे उमेदवार कोण ?

निवडणूक आचारसंहिताबाबतची प्रतीक्षा संपली
आता लक्ष विविध पक्षाच्या चिन्हांचे उमेदवार कोण ?

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक अखेर जाहीर झाली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक आचारसंहिता बाबत असणारी प्रतीक्षा संपली आहे, तर यापुढे उमेदवार किती आणि कोणत्या राजकिय पक्षाचे कोण असणार याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.निवडणूक आयोगाने देशातील १४ विधानसभा क्षेत्रातील पोट निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला असून यात पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा समावेश आहे. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे नोटीफिकेषण २३ मार्च रोजी निघणार असून ३० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. ३१ मार्च रोजी छाननी होणार असून 3 एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १७ एप्रिल रोजी मतदान होऊन पंढरपूर मतदार संघातील नवा आमदार कोण याचे उत्तर 2 मी रोजी मिळणार आहे.आजपासून मतदान एक महिन्यावर आले असून उमेदवारांना ही दोन तालुक्यातील मतदार यांच्याशी संपर्क ठेवावं लागणार आहे. त्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी यापूर्वीच संपर्क ठेवीत, आपले चिन्ह नंतर सांगतो परंतु आपण निवडणूक रिंगणात असणार असल्याचे सिद्ध करून दाखविले असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध नाही तर बरेच उमेदवार रिंगणात असणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button