Pandharpur

मनसेच्या वर्धापनदिनी आरोग्य व रक्तदान शिबीर   कोरोनानंतर लोकांचे संसार उभा करण्यासाठी मनसे कार्य करणार — दिलीप धोत्रे

मनसेच्या वर्धापनदिनी आरोग्य व रक्तदान शिबीर
कोरोनानंतर लोकांचे संसार उभा करण्यासाठी मनसे कार्य करणार — दिलीप धोत्रे

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 वा वर्धापन दिन पंढरपूरात रक्तदान व आरोग्य शिबीराच्या माध्यमातtन साजरा करण्यात आला आहे. साधेपणाने पक्षाचा वर्धापन दिन साजरा करीत असताना. आगामी काळाम सामान्यांचे संसार उभा करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने काम केले जाणार असल्यांची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस तथा श@डो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी दिली.
येथील तांबट धर्मशाळेमधे मनसेच्या वर्धापन दिनानिमितत आरोग्य व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानेच आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर घेउन साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्याचे निश्चीत करण्यात आले याप्रसंगी बोलताना मनसेचे दिलीप धोत्रे म्हणाले , कोरोनामुळे देशावर संकट आहे. अशातच रक्ताचा तुटवडा असल्याने कुठल्याहि प्रकारचा गाजा-वाजा न करता आपण पक्षांच्या धोरणानुसार वर्धापन दिन साजरा करीत आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने यापुढचया काळात कोरोनामुळे अडचणीत असलेले अनेक संसार पुन्हा उभा करणे. तरूणांच्या हाताला काम देणे. त्यांना उद्योजक म्हणून उभा करणे. असे कार्यक्रम येत्या काळात सोलापूर जिल्हयात राबवायचे आहेत. यासाठी मनसेच्या सैनिकांनी येत्या काळात अधिक जोमाने काम करावे. असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.या वर्धापन दिनी पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रताप भोसले , महिला अध्यक्ष रंजनाताई इंगोले , उपाध्यक्ष पूजा लवंगकर, स्वप्निल जाधव , मारूती ऐवळे , प्रथमेश पवार , तेजस गांजले , शैलैश धट , शुभम काकडे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button