Chopda

अपघातग्रस्तं रुग्णावर सात तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी.. जगन्नाथ बाविस्कर यांच्याकडून डॉ.कोल्हे हॉस्पिटल टिमचा सत्कार..

अपघातग्रस्तं रुग्णावर सात तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी.. जगन्नाथ बाविस्कर यांच्याकडून डॉ.कोल्हे हॉस्पिटल टिमचा सत्कार..

लतीश जैन चोपडा

चोपडा : तालुक्यातील सामा.कार्यकर्ते,मार्केट कमेटीचे माजी संचालक, ग. स.चे उपशाखाधिकारी जगन्नाथ टी बाविस्कर , (गोरगावले बुद्रुक) हे लग्नकार्याहून परतत असतांना अकुलखेडे नजीक देवीच्या मंदिरासमोरून कुत्रे आडवे आल्यामुळे मोटारसायकल घसरून त्यांचा मोठा अपघात झाला होता. सुदैवाने ते या अपघातातून बचावले.पण त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर चोपडा येथील डॉ.पाटील हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून डॉ. मोहन टी. पाटील (गोरगांवले बु.)यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव येथील डॉ.कोल्हे अेक्सिडेंट हॉस्पिटल येथे पुढील उपचारार्थ हलवण्यात आले होते. तेथे डॉ. मिलिंद कोल्हे यांनी त्यांच्यावर प्रभावी उपचार करून त्यांच्या हाडांवर सात तास चाललेली अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे सफल केली. त्या निमित्ताने जगन्नाथ बाविस्कर यांनी दवाखान्यातून सुटी घेतल्यावेळी डॉ. मिलिंद कोल्हे व त्यांच्या संपुर्ण टिमचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. मिलिंद कोल्हे, डॉ. मोहन टी. पाटील, भुलतज्ञ डॉ.श्री.बढे , आरोग्यसहाय्यक अमीर सर, राजू सर, विलास सर , सर्व परिचारिका व कर्मचारी तसेच बाविस्कर परिवारातील सर्व सदस्य व मित्र मंडळी हजर होती.
शेवटी स्वामी विवेकानंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रेमनाथ बाविस्कर (गोरगांवले बु.)यांनी सर्वांचे आभार मानले.
…………………….. ……….
“अपघातांमुळे हाडांचा चुरा झालेले रुग्ण येतात, पण त्याही पेक्षा जगन्नाथ बाविस्कर यांच्या पायावरील शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होती. त्यांचा आत्मविश्वास, इच्छाशक्ती व मौनसाधनेमुळे आम्हांस सहकार्य लाभले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद त्यांच्यासह आम्हांस ही आहे”.
– *डॉ. मिलिंद कोल्हे*,
संचालक,
कोल्हे अेक्सीडेंट हॉस्पिटल, जळगाव.
……………………………….
” माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी दिवस माझ्या अपघाताचा होता. डॉ. मिलिंद कोल्हे यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून मला जीवदान दिले आहे. त्यांना यासाठी ईश्वरिय देणगी लाभलेली असून त्यांच्या हातात जादू असल्याची अनुभूती मी घेतली आहे. यासाठी मी सदैव त्यांचा ऋणी राहील.
– *जगन्नाथ टि.बाविस्कर*
अपघातग्रस्तं रुग्ण/माजी सरपंच,
गोरगावले बु. ता. चोपडा
……………………………….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button