अडावद ला आयटक /किसान सभा तर्फे
काळे कृषी कामगार कायदे ग्रा पं नोटिसंची एकत्रित होळी!!
लतीश जैन चोपडा
चोपडा : चोपडा तालुक्यातील अडावद येथे लाल बावटा शेतमजुर युनियन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ किसान सभा अंगणवाडी कर्मचारी आयटक तर्फे नेताजी सुभाष चौकात केंद्र सरकारचे ३काळे कृषी कायदे…कामगार विरोधी कोड व तसेच ग्रामपंचायत अडावद चे विकास अधिकारी यांनी सफाई कामगारांना देण्यात आलेली खोटी नोटिसान ची कामगार नेते काम्रेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात होळी करण्यात येऊन निषेध व्यक्त केला
याबाबत सविस्तर माहिती अशी की,केंद्र सरकारने मनमानी पने तीन कृषी कायदे केले दिलेला ७५दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत ७०शेतकरी शहीद झाले आहेत कामगारांनी लढून मिळवलेले ४४ हक्क चे कायदे रद्द करून कामगार कोडे बिल लादत आहे हे सर्व कॉर्पोरेट वर्गाच्या भल्यासाठी चालले आहे त्याविरोधात तसेच अडावद येथील ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी यांनी कर्मचारी यांना १०महिन्यांचे पगार दिले नाहीत प्रविदांत फंड भरलेला नाही कामाचे साहित्य झाडू.. फावडे…. इत्यादी ही पुरेसे दिले नाहीत हे कमी की काय वरून दलित सफाई कर्मचारीना चढ उताराचे बोलणे..काम करत नाही सांगून आरोपीत करने सुरू असते म्हणून ..कर्मचारी नी प्रजास त्तक दिना अगोदर साफसफाई पताकांनी परिसर सुशोभित केला २६जानेवारीला झेंडा वंदन केले व नंतर तिसऱ्या दिवशी या त्रस्त कमचारींनी रीतसर २७जानेवारी रोजी अर्ज देऊन पोंच घेऊन २८ तारखेला त्यांच्या कर्मचारी विषयी आक्षेपार्ह व्यवहार विरुध्द सामुदायिक रजा टाकली गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार दिली ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सल्ल्याने रजेचा निर्णय मागे घेतला तरीही ग्राम विकास अधिकारी यांनी प्रजा सत्ताक दिनाचा संदर्भ घेऊन २९तारखेला लिहिलेली नोटीस २फेब्रुवारी स पोष्टात टाकून रजिस्टर पोस्टाने ३तारखेला दिल्या पगार व कामाचे आवश्यक साहित्य पुरेसे न देता असल्या त्रासाच्या विरोधात दिलेल्या नोटिसा जाळण्यात आल्या त्यावेळी मुकादम कैलास लक्ष्मण सोनवणे..शांतीलाल सैदाने हिरालाल सैदाणे प्रकाश साळुंखे सुकदेव सोनवणे समाधान भालेराव सुनील साळुंखे भीमराव साळुंखे जितेंद्र साळुंखे तसेच शेतमजूर युनियनचे कैलास माळी, जगन भील, बचत गट कार्यकर्त्या सुंदर बाई कोळी.. खटा बाई भोई .किसान सभा चे जिजाबाई राणे, राकेश महाजन, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शशिकला निंबाळकर व इतर अनेक त्यावेळी हजर होते…






