Pandharpur

DVPफुटबॉल चषक किटचे अनावरण सोहळा उत्साहात संपन्न…

DVPफुटबॉल चषक किटचे अनावरण सोहळा उत्साहात संपन्न…

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय फुटबॉल चषक आयोजित करण्यात येत आहे. DVP फुटबॉल चषकच्या किटचे अनावरण सोहळाDVP उद्योग समूहाचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट सारख्या सुविधांमुळे युवकांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु आरोग्य संवर्धनासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. युवकांना खेळाची आवड लागावी यादृष्टीने दिनांक ०५ ते ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वे मैदान, पंढरपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री.अभिजित पाटील यांनी सांगितले. या खेळामध्ये २० संघांनी सहभाग नोंदवला असून यात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, धुळे, नांदेड, बीड, अमरावती या ठिकाणच्या संघांचा समावेश आहे. आज कोरोना सारख्या एकंदरच परिस्थितीमुळे आरोग्यासाठी प्रतिकारक्षमता उत्तम राखणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी मैदानी खेळ हा उत्तम पर्याय ठरतो. म्हणूनच अधिकाधिक तरुणांनी या खेळात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री.पाटील यांनी केले. याप्रसंगी विठाई फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक आणि सर्व खेळाडूंची उपस्थिती होती.

DVPफुटबॉल चषक किटचे अनावरण सोहळा उत्साहात संपन्न...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button