Chopda

वन मंत्री यांच्या आदेशाने कर्जाणा ३३ के.व्ही. उपकेंद्राचा मार्ग होणार मोकळा आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश”

वन मंत्री यांच्या आदेशाने कर्जाणा ३३ के.व्ही. उपकेंद्राचा मार्ग होणार मोकळा
आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश”

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : आज दि. २७ जानेवारी २०२१ रोजी २.०० वा. राज्याचे वन मंत्री मा.ना.श्री.संजय राठोड यांच्या दालनात, मंत्रालय, मुंबई येथे कर्जाणा ३३ के.व्ही. उपकेंद्रासाठी ट्रान्समिशन लाईन टाकण्याकरीता वनविभागाच्या जागा उपलब्धतेचा प्रश्न आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नांने मार्गी लागणार आहे.
कर्जाणा, ता.चोपडा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्र सन २०१२ मध्ये मंजूर झाले होते. या सबस्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु या उपकेंद्रासाठी साठी ट्रान्समिशन लाईन टाकण्याकरीता १५.४ किमी वाहिनी वनक्षेत्रातून जात असल्याने वन विभागाच्या परवानगी अभावी सदरचे उपकेंद्र निकामी ठरले होते.
परंतु आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने लाईन वळते करण्यासाठी या २३.१० हेक्टर जमीनीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. त्याअनुषंगाने वन मंत्री मा.ना.श्री.संजय राठोड यांच्या दालनात झालेली बैठकीत कर्जाणा ३३ के.व्ही. उपकेंद्रासाठी ट्रान्समिशन लाईन टाकण्याकरीता महावितरण कंपनीला त्वरित नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी अवर सचिव, मा.श्री.सुनील पांढरे यांना दिले. यामुळे आदिवासी भागातील खाऱ्यापाडा, वैजापूर, शेनपाणी, मुळ्यावतार, कर्जाने, मेलाणे, जिरायतपाडा, देव्हारी, देवझिरी, बोरमळी व मालापूर या ११ गावातील आदिवासी बांधवाची विजेची समस्या सुटणार आहे.
यावेळी बैठकीला महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, धरणगाव शाखा अभियंता सुरज मंडवधरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button