जय रावण प्रतिष्ठान महा राज्य संघटने तर्फे चोपडा येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले…
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी गावातील आदिवासी मन्नेरवालु जमातीच्या
5 वर्षाच्या चिमुरडीचा बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली आहे.या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.अद्याप मुख्य
आरोपीं फरार आहे संशयित एक आरोपीला अटक करण्यात आली.चिमुकलीचा बलात्कार प्रकरणाकडे विशेष लक्ष घालून आरोपीना ताबडतोब पकडुन महा विकास आघाडीचा पुरोगामी शासनाने आणलेल्या स्त्री शक्ती कायद्या अतंर्गत फाशीची शिक्षाकक्षा देण्यात यावी ही घटना वारंवार आदिवासी समाजाच्या मुलींवर होत आहे सारखेडा येथील झालेल्या बलात्कार प्रकरण रायगड येथील झालेल्या मुलीवर बलात्कार प्रकरण आता नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ५ वर्षीय मुलींवर झालेल्या बलात्कार आरोपीला तात्काळ फाशी व्हावी अशी मागणी करतो की वारंवार बलात्कार होत आहे.तर याला आळ बसावा त्यासाठी राज्य सरकारने स्त्री शक्ती कायदा लवकरात लवकर अमलात अशी मागणी करतो आपले विनित
मयूर चव्हाण (उपाध्यक्ष महा) अजय पारधी (सचिव महा राज्य) विक्की पारधी (कार्याध्यक्ष महा राज्य) सागर पारधी (जळगांव प्रभारी जिल्हाध्यक्ष) अजय भाऊ पारधी (जळगांव प्रभारी उपाध्यक्ष) अशी मागणी जय रावण प्रतिष्ठान महा राज्य कडुन आज निवेदनाद्वारे चोपडा तहसीलदार सो यांच्या कडे मागणी करण्यात आली….