किमान साखर विक्री किंमत 3300 रुपये करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी घेतली नितीनजी गडकरी यांची भेट..
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : भारत देशाची राजधानी दिल्ली येथे आज देशांचे नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेतली यावेळी मा. सहकार मंत्री, आ. सुभाषबापू देशमुख, अविनाश महागांवकर साहेब, रेणुका शुगरचे व्हाईस चेअरमन रवीजी गुप्ता, दत्त इंडिया शुगरचे संचालक जितेंद्र धारूशेठ, परिश्रीत रुपारेल, माऊली शुगरचे चेअरमन व्ही.पी.पाटील, नसिंह साखर कारखान्याचे संचालक प्रमोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. साखर भाव MSP ३३००रू. करावी अशी मागणी सर्वांनी केली. त्याला गडकरीसाहेबानी येणाऱ्या कॅबिनेट मध्ये करुन घेऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. तसेच साखर निर्यातीचे धोरण व CNG गॅस निर्मिती बाबत सखोल चर्चा करून मार्गदर्शन मिळाले! महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाची मुर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. आज वेळ आमावस्या असल्याने हुरडा, पुरण पोळीचे जेवण साहेबांसोबतच बंगल्यावर केले.






