Chopda

देह विक्रय करणाऱ्या महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्यातल्या काही बायका जमवून गोपाळराव सोनवणे नावाच्या माणसाने तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले..

देह विक्रय करणाऱ्या महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्यातल्या काही बायका जमवून गोपाळराव सोनवणे नावाच्या माणसाने तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले..

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : ! स्त्री भोगायला चालते पण…….!
काल पर्वा सहज मोबाईल चाळत असतांना वर्तमान पत्रांच्या कटींग्स,आणि सोशल मीडिया वरील एक बातमी नजरेखालून गेली.चो
पडा शहराची होती.नगर परिषदेच्या मागील बाजूस जी वेश्यावस्ती आहे त्यांना न.प.ने नोटीसा बजावून जागा खाली करावी.असा काहीसा तो मजकूर होता.प्रारंभी दुर्लक्ष करीत माझी रोजची कामं आटोपलीत सायंकाळी घरी येऊन थोडं पहुडलो..पण आज काही तरी चुकतोय..काही तरी हरवतय..काही तरी विसरतोय..काही तरी राहिलंय या विचाराने अस्वस्थ वाटू लागले पुन्हा मोबाईल हाती घेतला स्क्रीनवर अंगठा गररकन फिरवत पुन्हा सकाळी अर्धवट वाचलेली ‘ती ‘ बातमी पुन्हा पूर्ण वाचली वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना चोपडा न.प.ने जागा खाली करण्याच्या नोटीसा दिल्यात.त्या देह विक्रय करणाऱ्या महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्यातल्या काही बायका जमवून गोपाळराव सोनवणे नावाच्या माणसाने तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले,यांना पर्यायी जागा व इतर शासकीय सुविधा द्याव्यात नंतरच त्यांना उध्वस्त करण्याचा विचार करावा असा इशारा दिला अशी ती बातमी होती.
देहविक्री करणाऱ्या या महिलांकडे समाज कोणत्या नजरेने बघतो हे सर्वश्रुत आहेच स्वतः देहविक्रय करणे हा या ललनांसाठी काही मर्जी
ने,आनंदाने केला जाणारा व्यवसाय नाही.यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण या वारांगना आहेत म्हणून आमच्या आया-बहिणी बायका-मुली सुरक्षित आहेत हे विसरून चालणार नाही,अथवा हे समाजाने न स्वीकारलेले ‘सत्य’च आहे.या ‘देवदास्यांच्या वस्त्या गावालगत आहेत त्यामुळे अनेक विकृत,आंबटशौकीन,स्त्रीलंपट,माथेफिरू,बेवडे-बावडे,मनोरुग्ण,आपली शारीरिक भूक यास्थळी भागवून शांत होतात.अन्यथा भर रस्त्यांवर विनयभंग,छेडखानी रेप,बलात्कारअशा घटना वाढायला वेळ लागणार नाही.बरं या ‘ रेडलाईट ‘एरीयात फक्त वर उल्लेख केलेलेच आपली भूक शमवण्यासाठी जातात असे नाही,शरीराचा धंदा करणाऱ्या वेश्यांच्या खोलीतील भिंतीवरच्या खुंटीवर अनेक खाकी-खादी,अन बाकीच्यांनी आपली वस्त्र टांगलीत,ती बिच्चारी आपली व परिवाराची पोटाची खळगी भरण्यासाठी विवस्त्र होत असली तरी खऱ्या अर्थाने पुरुषच त्या ठिकाणी सर्वार्थाने ‘नागडा’होत असतो.रात्रीच्या अंधारातही तोंड झाकून इथं जाणारे दिवसाच्या उजेडात तोंड वर करून शहरात समाजसेवेचा डोस पाजाळतांना दिसतात.या बदनाम गल्ल्यां मध्ये दररोज शेकडो माणसं ग्राहक बनून बोली लावून ‘ती ‘च्या शरीराचे लचके तोडतात,केवळ काही पैसे मिळतील या आशेपोटी तिच्या इच्छे विरुद्ध झालेला हा बलात्कार ती मुकाट्यानं सहन करते.आज त्यांच्यावर आपल्या बस्त्या उपटून फेकण्याची वेळ आलीय,शेकडोंनी आब्रू ओरबडणारे कित्ती त्यांच्या पाठीमागे उभे राहतील? त्यांच्या रक्षणासाठी किती आलेत?किती
येतील?चार भिंतींच्या आत अंधारात गरजवंत,लाचार स्त्रीयांजवळ शारीरिक मर्दपणा दाखवत असलेत तरी हे ‘ साले ‘सामाजिक दृष्ट्या ‘ हिजडे’ च आहेत लाखोंच्या संख्येत असणाऱ्या शहरात गोपाळराव सोनवणे मला खऱ्या अर्थाने ‘मर्द’म्हणावासा वाटतो.लाभ लोभ,नसतांना समाज काय म्हणेल याची तमा न बाळगता ज्यांना साऱ्यांनीं नाकारले त्यांच्या साठी लढायला हा माणूस समोर येऊन शासन प्रशासनाही दोन हात करायला तय्यार झाला निलेश भालेराव,किशोर दुसाने प्रदीप लिंबा पाटील या सेवा निवृत्त शिक्षकाने दाखवलेले धाडसही वाखाणण्याजोगे आहे.
माणसाने जंगल-अरण्य संपवलीत जंगलात खायला काही नाही म्हणून हिंस्त्र प्राणी मानवी वस्त्यांवर हल्ले करू लागलेत माणसांचा पाळीव प्राण्यांचा फडशा पाडू लागलेत अशा बातम्या वाचायला,ऐकायला येतायत ना!तोच हा प्रकार आहे ‘धंदेवाल्या’ म्हणून ज्यांना आम्ही
कोसतो त्यांच्या झोपड्या गेल्या की माणसातले निशाचर जे हिंस्त्र प्राण्यांपेक्षा कितीतरी भयंकर आहेत,त्यांचा मोर्चा आमच्या वस्तीकडे यायला फार वेळ लागणार नाही.कायदा आजही आहेच पोलीस आहेत न्यायालय आहेत अगदी फाशी होईपर्यंत शिक्षा आहे म्हणून चोऱ्या माऱ्या भांडण दरोडे खून,बलात्कार व्हायचे थांबलेत ? भर दरबारात द्रौपदी ‘वस्त्रहरण’ आजही होतेच चिरहरण थांबवून तीची इभ्रत वाचवणारा कृष्ण कधीच द्वारका सोडून निघून गेलाय.आत्ता उरलेत सारे दुर्योधन-दुःशासन जे अबलेच्या शरीरावरील कापडं उतरवण्यात आपके शौर्य
मानतात,राक्षसी आनंद लुटतात.उरलेत फक्त कौरव घोळका करून एकजुटीने हल्ला करणारे पांडव तर कधीच धाराशायी झालेत,शस्त्र टाकलीत त्यांनी या पापधार्जिण्या समूहा समोर आत्ता उरलाय तो केवळ…आणि केवळ स्वार्थ
चोपडा प्रशासन या देव दास्यांना हटवून इथं काय नंदनवन उभारणार आहे?आधी शहरातलं बघा म्हणावं एक रस्ता ठिकाणावर नाही,गल्ली बोळ खड्डयांनी त्रस्त झालेत आरोग्य सोयी सुविधा नाहीत.शहरातील जनता आपल्या बद्दल काय बोलते याचा कधीतरी कानोसा घ्या.उगाच आपल्याच पैश्याच्या मस्तीत राहू नका.फार काळ टिकत नाही हे.वेश्यावस्ती वाढल्या पाहिजेत अथवा त्या व्यवसायाचे मी समर्थन करतो असे नाही त्याविषयी काही लाभ लोभही नाही.प्रशासनाला काही करायचेच असेल तर त्यांनी या दुर्भागिणी वारांगणांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी,रीतसर मान्यता देऊन मोठ्या शहरात असते तशी त्यांची दरमहा वैद्यकीय तपासणी करून द्यावी ज्यांच्याकडे रेशनकार्ड, मतदान कार्ड आहेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा.शासनाने यांना रुपये सात हजार मानधन लागू केले आहे ते मिळावे. भविष्यात या सोयी होऊद्या आणि ही वेश्यालय चालवण्याची फक्त अधिकृत टेंडर निघू दया, बघा इथं शेण खायला कोण येतं? हे विदारक पण वास्तव सत्य आहे.हेच व्हाईट कॉलर-पांढरपेशे टेंडर भरायला चढाओढ करतांना आपणच बघू.जे रेती खाऊ शकतात डबर,डाम्बर,खडी,रस्ते,
कचरा,झाडं, खातात,संडास बांधण्याची टेंडर घेऊन ‘गु’ खाऊ शकतात त्यांना शेण खाणं फार अवघड नसावे.मानवतेच्या दृष्टीने ‘षंढ’ झालेली मनोवृत्ती फोफावली की हे असे घडणारच.न.प.च्या मागे असणाऱ्या या वस्तीत राहणाऱ्या बायकांना लॉकडाऊन काळात प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या वतीने आम्ही महिनाभर मोफत जेवण वाटप केले.त्याकाळी अन्नदानासाठी अनेकांनी सढळ हाताने आम्हाला मदत केली.त्यावेळी काही देहविक्रय करणाऱ्या देवदास्या स्वतःहुन पुढे येऊन म्हणाल्या होत्या ‘साहेब आता तर आमच्या शरीराला सुद्धा ग्राहक नाही आम्ही जगायचे कसे?
शेजारी स्मशानात आगीच्या दाहकतेत फडफड आवाज करून जळणारी मानवी शरीर समोर कबरीखाली गाडली गेलेली प्रेतं अशा जीवघेण्या रात्रीच्या अंधारात दररोज जळणार आपलं शरीर,गाडली जाणारी स्वतःची इज्जत कोणाला आवडेल असं जगणं-असं आयुष्य अशा या देवदास्या.स्त्री ही भोगायला चालते पण….तिच्या रक्षणाची पुनर्वसनाची वेळ आली की
सारे मागच्या पावलांनी वाट कापतात.घटनेने सर्व मानवी प्राण्यांना जगण्याचा समान अधिकार दिला आहे.तसा तो यांनाही आहेच.कुठलाही स्वार्थ नसतांना या दुर्लक्षित उपेक्षित घटकांसाठी गोपाळराव सोनवणे पुढे सरसावले आहेत त्यांचे सर्वप्रथम मनापासून अभिनंदन… आणि गोपाळराव मी आपल्या सोबत आहे…..!
सविस्तर माहिती गोपाळ सोनवणे व शाम जाधव पत्रकार, आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांन कडून मिळाली…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button