Pandharpur

पंढरपूरकर नागरिकांसाठी आनंदाची बातमी, उद्या मिळणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन..

पंढरपूरकर नागरिकांसाठी आनंदाची बातमी, उद्या मिळणार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन..

रफिक अत्तार पंढरपूर

Pandharpur : पंढरपूरकर नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून उद्या शुक्रवार दि २७ नोव्हेंबर रोजी सर्व पंढरपूरकरना सकाळी६ते रात्री १२या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन दर्शन पास ची गरज नसून केवळ आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवायचे आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मा.राज्य शासनाने दि.१४-११-२०२०रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि.१६ नोव्हेंबरपासून दर्षनासाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन आॅनलाईन बुकींग करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.आज दि.१६नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी संपन्न होत आहे. कार्तिकी यात्रेला दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे दि. २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. तथापि पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांकडून श्रींचे दर्शन देण्याचंी मागणी होत आहे. ही बाब विचारात घेवून, उद्या शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ते रात्री १३ या वेळेत पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी आॅनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नाही. मात्र पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिक असलेबाबतचा पुरावा (आधारकार्ड/मतदानकार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोना विशाणूच्या पार्श्वभूमीवर ६५वर्षापूढील व्यक्ती, १० वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे.
सदरचे पत्रक मंदिर समितीचे मा.सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती.शकुंतला नडगिरे, डाॅ.दिनेशकुमार कदम. श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री.संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ. श्री.भागवतभुशण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button