Pandharpur

कारखान्याची निवडणूक डोळ्यामसोर ठेवूनच विठ्ठल परिवाराचे तुणतुणे-माऊली हळणवर जेल भोगलेले कामगारही विठ्ठल परिवाराचेच घटक होते हे विसरु नका

कारखान्याची निवडणूक डोळ्यामसोर ठेवूनच विठ्ठल परिवाराचे तुणतुणे-माऊली हळणवर जेल भोगलेले कामगारही विठ्ठल परिवाराचेच घटक होते हे विसरु नका

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना शरद पवार यांच्या भेटी वेळी
आ.भालकेंच्या बंगल्यात प्रवेश नाकारण्यात आला ही वस्तूस्थिती आहे.एका कारखान्याचे चेअरमन व विठ्ठल परिवारातील प्रभावी नेते म्हणून कल्याणराव काळे ओळखले जात असताना व सहकार शिरोमणी साखर कारखान्यास थकहमीचा प्रश्‍न रखडलेला असल्यामुळे कल्याणराव काळे हे भेटण्यासाठी आलेले असताना त्यांना प्रवेश नाकारला जाणे चुकीचेच होते.याच भेेटीत कल्याणराव काळे यांच्या विरोधकांना प्रवेश मिळतो,ते काळेंच्या विरोधात निवेदन देतात त्यांना मात्र भेटीची परवानगी दिली जाते या मागचे राजकारण न समजण्या इतका विठ्ठल परिवारातील शेतकरी आता दुधखुळा राहीला नाही.विठ्ठल परिवारात अगदी स्व.राजभाऊ पाटील चेअरमन झाले होते तेव्हा पासून डबल गेम कोण खेळत आले आहे हे उघड गुपीत आहे.त्यामुळे आ.भालके हे सद्या जो विठ्ठल परिवाराचा राग आळवत आहेत तो विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक ठेवून आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ज्या कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी जेल भोगावा लागला तेही परिवारातील शेतकर्‍यांचीच पोरे होती याचा विसर आ.भालकेंना पडला होता काय असा सवाल माऊली हळणवर यांनी उपस्थित केला आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत विठ्ठल परिवारात फक्त आपलेच वर्चस्व राखण्यासाठी जी विश्‍वासघाताची मालीका आ.भालकेंनी सुरु केली होती ती अजुनही थांबलेली नाही त्यामुळे 2009 च्या विधानसभा निवडणूकीत कल्याणराव काळे आणि स्व.राजूबापू पाटील यांनी आ.भालके यांच्या ऐजवी विजयदादांचा प्रचार करणे योग्य समजले होते.आ.भालकेंच्या दुहेरी नितीला कंटाळून विठ्ठल परिवारावर निस्सिम प्रेम करणार्‍या अनेक जुन्या जाणत्या जेष्ठ नेत्यांनी राजकारणापासून दूर राहणे पसंद केले.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा शेतकर्‍यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो आणि परिवारातील प्रत्येकाचे अस्मितेचे प्रतीक आहे.मात्र गेल्या काही वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास कर्जाच्या खाईत लोटत लोटत अखेर आ.भालकेंच्या कारकिर्दीत गत वर्षीच्या गळीत हंगामात हा कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली.ज्या विठ्ठल परिवाराचा आज भालके राग आळवत आहेत त्याच विठ्ठल परिवाराचे घटक असलेल्या कारखान्याचे मालक असलेल्या सभासदांना आपला ऊस गाळपास पाठविण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागले.तर 14 महिन्याचा थकलेला पगार मागीतला म्हणून या कारखान्यात काम करणार्‍या कामगारांना शेतकर्‍यांच्या पोरांना तुरुंगवास भोगावा लागला.त्यामुळेच या कारखान्याचे चेअरमन असलेल्या आ.भारत भालके यांच्याबद्दल विठ्ठल परिवारात सुप्त नाराजी असून लोक उघडपणे बोलत नसले तरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणूकीत या कारखान्याच्या सभासदांनी आ.भालके यांना धडा शिकविण्याचा ठाम निर्धार केला असून याची जाणीव आ.भालकेंना झाल्यामुळेच ते आता विठ्ठल परिवारातील प्रबळ नेत्यांना भूलवत निवडणूक पार पाडण्याचे मनसुबे रचत आहेत अशी प्रतिक्रीया माउली हळणवर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button