हथरस अमानुष बलात्कार प्रकरणी दोषींना तात्काळ फाशी द्या..
प्रतिनिधी
रफीक आत्तार
उत्तरप्रदेश प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील भूतगडी गावातील 19 वर्षीय दलित मुलीवर चार नराधमांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले. आरोपीने क्रुरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. दिनांक 28 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. दिनांक 29 सप्टेंबर रोजी पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणी ती शहीद झाली. मृत्यूनंतरही विटंबना सुरु होती उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्रीतच कुटुंबीयांना न सांगता तरुणीवर अंत्यसंस्कार केले. संविधानिक स्वतंत्र भारतात माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून ताबडतोब आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भिमशक्ती
सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व उमेश सर्वगोड मित्र परिवार पंढरपुर यांच्यावतीने करण्यात आली संबंधित मागणीचे निवेदन तहसिलदार व पंढरपुर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले.