आ.भालके यांनी पंढरपूर तालुक्यातील प्रमुख अधिकार्यांची घेतली आढावा बैठक
प्रतिनिधी रफीक आत्तार
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गजन्य आजाराचे रूग्न आढळून येत असल्याने या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील सर्व विभागातील प्रमुख अधिकार्यांन सोबत सर्व विभागातील दैनंदिन अडीअडचणी बाबतीत आढावा बैठक घेत कोरोना रोगाच्या साथीमध्ये सर्वांनी सतर्क रहावे तसेच सर्व सामान्य लोकांना केंद्र बिंदू मानून काम करण्याच्या सुचना आज येथिल शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी दिल्या आहेत.व भालके यांनी यावेळी नागरिकांनाही शासकीय सुचनांचे पालण करण्याचे आवाहन केले आहे.






