पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी केली रस्त्यावर कला सादर.
कलावंतांचे विविध मागण्यांसाठी पंढरपूर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण.
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी पंढरपूर तहसील समोर भजन, कीर्तन, गोंधळ, भारुड, बँड बाजा, पोतराजा, वाघ्या मुरळी यासह विविध कला सादर करत कलावंतांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.कोरोनाच्या संकटामुळे जत्रा, यात्रा, उत्सव बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कलावंतांनी पंढरपूर तहसील सुमारे पाचशेहून अधिक कलाकारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी कलावंतांना कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी, कलावंतांच्या मुलांना चालू वर्षाची शैक्षणिक फि माफ करण्यात यावी, कलावंतांसाठी आर्थिक मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.






