राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा पदी सौ संगिता माने
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ.संगिता राजेंद्र माने यांची नुकतीच निवड करण्यात आली.सौ.माने यांना शहराध्यक्षापदी निवड झाल्याचे निवडपत्र आ.भारतनाना भालके यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.अनिताताई नागणे,पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ.अनिताताई पवार,सौ.प्राजक्ता परचंडराव,सौ.कल्याणी कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी सौ.माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचवून महिला संघटन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर , आम.भारतनाना भालके,जिल्हाअध्यक्षा अनिताताई नागणे यांचे माध्यमातून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन शहराध्यक्षा संगिता माने यांनी सांगितले.






