खामखेडा प्राथमिक शाळेत डोनेट बुक उपक्रमानंतर्गत सैनिका कडून पुस्तके दान
प्रतिनिधी देवळा महेश शिरोरे
देवळा तालुक्यातील खामखेडा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डोनेट बुक उपक्रमांर्गत गोरख शेवाळे या सैनिकाने वाचनालयासाठी भरपूर पुस्तके दान केली . जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीवजी म्हस्कर , व देवळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाने डोनेट बुक उपक्रमांतर्गत वाचन कट्टा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल ,सबको पढाव आगे आगे जाओ ,संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनुप शेवाळे तसेच सहकारी शिक्षक आबा शेवाळे यांनी वाचनालयाबाबत सविस्तर माहिती कथन केली असता विविध शाळातून गावातून समाजातून दानशूर व्यक्तींकडून वेगवेगळ्या वाचनीय पुस्तकांचा संग्रह करून आपल्या शाळेत शाळा तिथे वाचनालय उपक्रम. सुसज्ज वाचनालय सुरू करण्यासंदर्भात माहिती दिली असता लगेच गावातील दानशूर व्यक्ती सध्या सैन्यदलात कार्यरत असलेले . गोरख भिका शेवाळे सैनिक हे देश सेवा करत करत ग्रामसेवा शिक्षण सेवा, आरोग्य सेवा, याबाबतीत सदैव तत्पर असतात. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा .या धरतीवर यांनी आपल्या गावातील शाळेसाठी पुस्तक घेण्यासाठी मोलाचा वाटा एक चांगला सहभाग म्हणून पंधराशे रुपये ची देणगी दिली तसेच व्यवस्थापन समिती बरोबर गावातील ग्रामस्थांनी देखील काही अंशी मदत करत100 पेक्षा जास्त पुस्तके येतील एवढी रक्कम जमा करून विविध वाचनीय पुस्तके बोधकथा कथा संग्रह ,शूरांच्या कथा, आजीबाईचा बटवा, आरोग्य व्यायाम, सकस आहार, बालमित्र अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा बंच शालेय परिसरात मांडणी करत वाचनालयाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करून मुलांमध्ये वाचन विकास संकल्पना स्पष्ट करून जास्तीत जास्त मुलांनी नियमित वाचन करून आपले वाचन प्रेम व वाचन वेड वाढवावे . स्मरणात ठेवून कविता लेखन ,कथालेखन करण्याचा सराव करण्यास उपयोग होईल व तसा प्रत्येक मुलाने प्रयत्न केल्यास ग्रंथालयाचा उद्देश गाव तिथे वाचनालय शाळा तिथे ग्रंथालय निश्चितच यशस्वी होईल. शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच उखडयाबाई पवार,उपसरपंच संजय मोरे ,अण्णा पाटील, बापू शेवाळे , अरुण शेवाळे, संचालक सुनील शेवाळे व सर्व सदस्य ,व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रत्येक प्रसंगी वेळोवेळी आपल्या शाळे बाबत अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. असेच
सहकार्य व प्रेम दिल्यामुळे निश्चितच आपली शाळा प्रगतीपथाकडे झेपावेल यात शंका नाही. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनुप शेवाळे
शिक्षण विस्ताराधिकारी किरण विसावे.
केंद्रप्रमुख शिरिष पवार.
मुख्याध्यापिका श्रीमती संगीता सूर्यवंशी, उप शिक्षक श्रीमती चित्रा सोनवणे, आबा शेवाळे, निलेश कदम. आदी उपस्थित होते.






