Pandharpur

नगरसेविका राजश्री गंगेकर व नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी प्रयत्नाकरून म्हसोबा चौकातील रस्त्यावरील सांडपाण्याचे केले बंदोबस्त नगरसेवक गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

नगरसेविका राजश्री गंगेकर व नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी प्रयत्नाकरून म्हसोबा चौकातील रस्त्यावरील सांडपाण्याचे केले बंदोबस्त नगरसेवक गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर येथील भगवती नगर येथे पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचुन रस्त्यावर पाणी साठल्यामुळे ये जा करणार्‍या नागरीकांना यामुळे त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेवून प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका सौ. राजश्री प्रताप गंगेकर व नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांनी वैयक्‍तीक लक्ष घालून पाणी साठू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश नगरपरिषद कर्मचार्‍यांना देवून प्रश्‍न सोडविला.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे सर्वत्र दमदार पावसाची हजेरी लावत आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये बहुतांश सर्वच ठिकाणी सिमेंट क्राँक्रीटचे रोड तयार करण्यात आले आहे. मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे भगवती नगर येथील म्हसोबा चौकात येथील गुळखेडकर महाराज यांच्या घरासमोरील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साठत होते. यामुळे परिसरातील नागरीकांना ये जा करताना तारेवरील कसरात करावी लागत होती. तसेच या भागात राहणार्‍या वाहन चालकांनाही याचा सामना करावा लागत होता. ही अडचण प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका सौ. राजश्रीताई प्रताप गंगेकर व नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात पाठपुरावा करून संबंधीत विभागाच्या कर्मचार्‍यांना पाणी साठलेला परिसर दाखवून त्या ठिकाणी चार खोदून तेथे साठणारे पाणी चेंबरमध्ये सोडण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याप्रमाणे नगरपरिषद कर्मचार्‍यांनी चार खोदून त्या ठिकाणी साठणार्‍या पाण्याचा बंदोबस्त केला. यामुळे या परिसरातील नागरीकातून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांच्या काही अडचणी असल्यास नगरसेविका सौ. राजश्रीताई प्रताप गंगेकर व नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर यांची संपर्क साधावा असे आवाहनही नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button