पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांची रॅपिड कोरोना तपासणी होणार
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांची बैठक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव पक्षनेते गुरुदास अभ्यंकर उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर व शहरातील व्यापारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बोलताना मुख्याधिकारी यांनी संबंधित व्यापारी यांच्याशी चर्चा करताना पंढरपूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या विचारात घेता शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा रॅपिड कोरोना टेस्ट घेण्याबाबत मा जिल्हाधिकारी साहेब यांनी सूचना दिल्या आहेत त्या सूचनेनुसार शहरातील व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट घेणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच या तपासणीचे वेळी काही व्यापारी अथवा त्यांच्या दुकानातील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास अशा रुग्णांची घरी राहण्याची वेगळी सोय असल्यास त्यांचे होम आयसोलेशन करण्यात येईल तसेच ज्यांना अशी सोय नाही अशा रुग्णांना नगरपरिषदेच्या 65 एकर येथील covid-19 कोविड केअर सेंटर अथवा एमआयटी कॉलेज येथे सोय करण्यात येईल अशी माहिती दिली यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून असा कार्यक्रम निश्चितपणे राबवू असे आश्वासन दिले यावेळी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पद्म कुमार गांधी ,विजय कुमार परदेशी, शैलेंद्र बजाज ,गोविंद गाडे, अजित सावळे ,राजगोपाल भट्टड, सचिन म्हमाणे, राजकुमार गांधी राहुल मोहिते, रवींद्र वांगीकर जयसिंग भालके, महेश गानमोटे नगरसेवक संजय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे नवनाथ रानगट व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.






