भैरवनाथ व कनिष्ठ महाविद्यालय सरकोली येथे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे श्री डॉ बिभीषण रणदिवे साहेब यांचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व शिक्षक स्टॉप कडून श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला पंढरपूर तालुक्याची शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पाहून प्राचार्य पदाची अतिरिक्त कारभार मिळालेले आहे पद कुठलेही मिळव डिग्री कुठलीही मिळवा गर्व करू नये असे ब्रीद वाक्य म्हणजे आमचे डॉ बिभिषण रणदिवे साहेब त्यांचे ब्रीदवाक्य आहे समाजामध्ये वावरताना सामाजिक बांधिलकी जपत व सर्व जाती धर्मांना घेऊन समाजाच्या विकासासाठी लढणारे सर व प्राचार्य आहे यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत उपस्थित नसले तरी सर्व विद्यार्थ्यांना गुगल अॅप,मीट अॅप,चिली मिली कार्यक्रम, शिक्षक- विद्यार्थी ग्रुप करून सर्व विद्यार्थ्यां शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात आले.
5 वी व 8वी शिष्यवृत्ती ,8 वी NMMS परीक्षा व 10 वी NTS परीक्षा यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या.याबाबतची कार्यवाही त्वरित चालू करण्याचा त्यांचा मानस आहे.ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेण्याबाबत डॉ.रणदिवे नेहमी आग्रही व सतर्क असतात.






