विरवाडे येथील घडलेल्या दुःखद घटनेच्या विषयी सोशल मीडिया वर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध चोपडा पोलिस निरीक्षक व तहसिलदार यांना निवेदन
रजनीकांत पाटील
चोपडा-विरवाडे येथे गेल्या ०१/०९/२०२० रोजी गावातील राजपूत समाजातील तीन तरुण मुलांचा नदीच्या डोहात दुर्दैवाने अंत झाला.यामुळे तालुकभर शोककळा पसरली असता अनेक लोकांनी सोशल मीडिया वर या युवकांना श्रद्धांजली अर्पण केली. यातच दि.०६/०९/२०२० रोजी अश्याच श्रद्धांजली च्या पोस्ट वर एका माणूसकी हीन,नालायक वृत्तीच्या राजकमल पाटील या व्यक्तीने मनाला दुखवणारी कमेंट केली की,”खुप छान झाले,नदीचे पाणी घाण करायला गेले होते आणि स्वतः च गेले”. तसेच या व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने हिंदू देव-देवतांचे ही विडंबना केली.व या मृतात्माच्या ही अवहेलना केली.
या घटनेविषयी संपूर्ण तालुकाभर हळहळ व्यक्त होत असताना अश्या अतिशय घाणेरड्या व खालच्या दर्जाचे कमेंट करुन सदर व्यक्तीने हिंदू बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवली.
तरी यासंबंधी आज चोपडा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक व तहसिलदार साहेब यांना त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन देवून निषेध केला.यावेळी दिव्यांक सावंत,करण राजपूत,अक्षय पाटील,प्रणव राजपूत,प्रेम बाविस्कर, देवेंद्र शिरसाठ,सोनू पाटील, निलेश जगताप उपस्थित होते.






