Pandharpur

सर्वासाठी मंदिर खुले न केल्यास दहा दिवसानंतर परत पंढरपूरला येणार असल्याचा सरकारला प्रकाश आंबेडकर यांचा ईशारा

सर्वासाठी मंदिर खुले न केल्यास दहा दिवसानंतर परत पंढरपूरला येणार असल्याचा सरकारला प्रकाश आंबेडकर यांचा ईशारा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर। राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु केली जातील.त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे,अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली असल्याने हे आंदोलन तात्पुरते थांबविले असून येत्या दहा दिवतात हे मंदिर सर्व लोकांना खुले नाही झाले तर मी परत येईन असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिलाआहे.

राज्यातील मंदिरे उघडावीत यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले. सरकारच्या आश्वासनानंतर तुर्तास प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन मागे घेतले. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला १० दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांना विठुरायाचे मुखदर्शन घेऊ देण्यात आले. मात्र, याचा अर्थ आंदोलन यशस्वी झाले, असा होत नाही. मंत्रालयातून आम्हाला निरोप आला की, प्रार्थनास्थळी जाण्यासाठी सरकारकडून नियमावली तयार केली जाईल. येत्या आठ दिवसांत यासंदर्भातला निर्णय घेऊ, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.या आंदोलन साठी आलेल्या वारकरी यांनी शिवाजी चौकात भजन करून हे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले असे सूचित करण्यात आले. राज्यातून अनेक भागातील वंचित बहुजन चे पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनासाठी माऊली हलनवर,दत्तात्रय खडतरे आदींनी परिश्रम घेतले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button