जनसेवा मंडळ,सुरगाणा-पेठ, मार्फत वाढदिवसाचे औचित्य साधून ग्राम स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश…….!
सुरगाणा विजय कानडे
” जनसेवा मंडळ व करंजखेड गांवातील ग्रामस्थ यांच्या मार्फत गणेश रघुनाथ घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त पेठ तालुक्यातील करंजखेड गांवात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला खुप महत्व प्राप्त झाले आहे, त्याच बरोबर अनेक रोगांचे कारण म्हणजे अस्वच्छता आहे तसेच पावसाळा असल्या कारणाने गवत मोठया प्रमाणावर वाढले आहे त्यामुळे अनेक भागात सर्प दंशाचे प्रमाणही वाढले आहे, या सर्व गोष्टीना आळा बसावा व सर्वांना स्वच्छतेचे महत्व समजावे म्हणून या अभियानात जनसेवा मंडळाचे जनसेवक मा.मनोहरभाऊ जाधव. मा.दिलीप भाऊ महाले. मा.कमलेशभाऊ वाघमारे. हनुमंत वाघमारे. पंडित गवे,धनाजी लहरे,कृष्णा वाघमारे, पंढरीनाथ भडांगे,कमलाकर गवे, जनसेवा मंडळ दाभाडी,जनसेवा मंडळ टापुपाडा, कार्यकर्ते व गांवातील ग्रामस्थ तसेच महिला मिराताई राऊत, आदी भगिनींनी मिळून संपूर्ण गावातील गवत काडून संपूर्ण गांव परिसर धुऊन स्वच्छ केला ,या प्रसंगी करंजखेड गांवातील ग्रामपंचायतचे सरपंच ठकुबाई मोरे, ग्रामसेवक मेहते भाऊसाहेब,सदस्य यांच्या मार्फत गांवात ठीकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या.
या कामात योगेशभाऊ चौधरी व जनसेवा मंडळ टापुपाडा व दाभाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात ग्रामस्थांनी जनसेवा मंडळ, जनसेवकांचे आभार मानले.
या प्रसंगी लहूदास गवे,परशराम मुकणे,ज्ञानेश्वर शेवरे, अंबादास गवे,भाऊराव गवे, धनराज चौधरी,मंगेश चौधरी,कैलास चौधरी, कैलास गवे, आदी मान्यवर उपस्थित होते.






