रावेर

शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर देण्यास रावेर तालुका मराठा युवा संघाचा विरोध….

शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर देण्यास रावेर तालुका मराठा युवा संघाचा विरोध….

शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर देण्यास रावेर तालुका मराठा युवा संघाचा विरोध....

रावेर प्रतिनिधी विलास ताठे 
-महाराष्ट्र सरकारने शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर देणे हा कुटील डाव असून यास रावेर तालुका मराठा युवसंघ तीव्र विरोध आहे व हा डाव आम्ही हाणून पाडू.
    शिवकालीन किल्ले हा मोठा वारसा आहे,त्याचे जतन, संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे,त्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी अशी आमची भूमिका आहे.शासनाने शिवकालीन सर्व किल्ले इतिहासाचे विकृतीकरण न करता जागतिक वास्तू रचनाकारांचे व पुरातत्व विभागाचे सहकार्य घेऊन सदरील किल्ले मूळ स्वरूपात पुनर्निर्माण करावे व हे करतांना किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे.
   किल्ले मूळ स्वरूपात पुन्हा उभारल्यास पर्यटनालाही मोठी चालना मिळेल,लोकांना इतिहास कळेल.
हेरीटेज च्या नावाखाली मूळ वारसा नष्ट करून हॉटेल संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न चुकीचा आहे.महाराष्ट्रातील जनता हे कदापिही सहन करणार नाही…
हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रावेर तालुका मराठा युवा संघा तर्फे निर्णय मागे घेई पर्यंत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री निळकंठ चौधरी, पं.स.सदस्य दिपक पाटील,पं.स.सदस्य श्री योगेश पाटील,सचिन पाटील,श्री किशोर पाटील,श्री विनोद चौधरी,श्री योगेश महाजन,श्री अतुल पाटील,श्री प्रशांत पाटील,श्री विलास ताठे  डी.डी.वाणी,श्री हर्षल पाटील,श्री आकाश पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button