गोल्डन अपॉर्च्युनिटीज आयोजित ऑनलाइन काव्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी रफीक आत्तार
गोल्डन अपॉर्च्युनिटीज तसेच श्री नरेंद्र लक्ष्मण लोहार व सौ यामिनी नरेंद्र लोहार यांच्या वतीने काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढलेले नैराश्य यातून कवी वर्गासाठी एक उत्तम पर्याय म्हणजेच काव्य स्पर्धा.. या काव्य स्पर्धेचा विषय होता.”ती आणि लॉक डाऊन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती ही असतेच.आई,बहीण,पत्नी,मैत्रीण अशा अनेक रूपांमध्ये ती आपल्या आजूबाजूला वावरत असते.या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला तिच्या एका वेगळ्या रुपाची ओळख झाली,नव्हे नव्हे तर ती प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे याची जाणीव झाली. तिची होत असलेली ओढाताण आणि तिच्यात असलेले घरांचं घरपण जपण्यांचं कौशल्य, मांडणाऱ्या कविता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून कवी कवयित्रींनी सादर केल्या. या स्पर्धा गोल्डन अपाॅरच्युनिटीज यूट्यूब च्या माध्यमातून राबविण्यात आल्या होत्या..
ती आणि लाॅकडाऊन” या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक- सौ.किरण रवी हटवार.
द्वितीय क्रमांक – कु.उद्देश दिनेश घवाळे.
तृतीय क्रमांक – सौ. हर्षा अजय मोडक-नागपुर उत्तेजनार्थ क्रमांक.
गोविंद प्रकाश मुंडे.
श्री.बाळकृष्ण अमृतकर-पुणे
श्री.विनोद देशमुख पालघर.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुदाम लगड, राजेंद्र वनराज लोहार, फिरोज शेख, हेमराज यमाजी वाघ, लोमेश वनराज लोहार, ईश्वर रामदास महाजन, पंकज नाले,पार्थ भेंडेकर यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी वनराज लिलाधर लोहार, लक्ष्मण चांगो लोहार, मनोज रामदास चव्हाण, मनोज भावलाल लोहार, राकेश लोहार आणि संपूर्ण मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळाल्या.सर्वांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले.सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच नरेंद्र लोहार सौ.यामिनी लोहार आणि गोल्डन अपाॅरच्युनिटीजच्या टिम ने सर्व कवी कवयित्री यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






