Chopda

भगवान बलराम शक्ती व मेहनतीचे द्योतक – विठ्ठलदास गुजराथी भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पुजन….

भगवान बलराम शक्ती व मेहनतीचे द्योतक – विठ्ठलदास गुजराथी

भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पुजन

लतीश जैन

चोपडा – भगवान बलराम आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे पहिले शेतकरी समजले जातात.त्यांना भारतीय किसान संघ शक्ती व मेहनतीचे द्योतक समजत असल्याने भाद्रपद शुध्द शष्ठी या त्यांच्या जयंती दिनी त्यांचे पुजन करुन किसान बांधवांना त्या निमित्ताने नविन उर्जा मिळण्यासाठी प्रार्थना करीत असतो.यंदा किसानांच्या कसोटीचा काळ सुरु आहे.त्यातून बाहेर पडण्यासाठी, करोनावर मात करण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलदास गुजराथी यांनी येथे केले.

येथील चोपडा कसबे वि.का.सोसायटीच्या सभागृहात भारतीय किसान संघाच्या शाखेतर्फे कृषक देवता भगवान बलराम यांच्या जयंती निमित्ताने भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पुजन किसान संघाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलदास छगनलाल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते गोविंदराव मराठे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.तसेच विविध घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी भारतीय किसान संघाच्या शाखाध्यक्षा कविता वाणी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत नेवे,मंत्री भगवान न्हायदे,पदाधिकारी भानूदास पाटील, रा.स्व.संघाचे उल्हास गुजराथी,हेमंत वाणी,तालुका युवा प्रमुख राहूल महाजन आदि उपस्थित होते.आभार प्रदर्शन कविता वाणी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र महाजन,राजेश बडगुजर, मोतीलाल सोनार यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button