? Crime Dairy..अडावदमधील २ लाख २० हजारांची रोकड चोरणारा एलसीबीच्या जाळ्यात
नूरखान
चोपडा – तालुक्यातील अडावद येथील दोन लाख वीस हजाराची रोकड आणि दोन मोबाईल अश्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेने मोजक्या सहा दिवसात दोन पैकी एक चोराला पकडले असून दुसऱ्या चोराचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि. ९ ऑगस्ट रोजी पहाटे स्टेट बैंक शेजारी राहणारे जफर खान खलील खान व फजलूल हक अ. रउफ यांच्या दोघांच्या घरी चोरांनी हात साफ केला होता. त्यात त्यांनी जाफर खान यांच्या घरातून चक्क २ लाख २० हजाराची रोकड व शेख फाजलुल हक यांच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेले होते. या गुन्ह्यातील मोबाईल अडावद पोलिस ठाण्याचे स.पो.नि. योगेश तांदळे व पीएसआय यादव भदाणे यांनी ट्रेस करून पाटचारीवरून बेवारस स्थितीत हस्तगत केले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पीएसआय सुधाकर लहारे, एएसआय नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराले, दीपक शिंदे यानी चोरिचा आरोपी सुनील अमरसिंग बारेला (रा. गवऱ्यापाडा, ता. चोपडा) यास चुनचाळे (ता. चोपडा) येथून अटक केली आहे. ज्या नोटांच्या बंडलांचा फिर्यादीत उल्लेख केला आहे, ज्या बँकेतून पैसे आणले होते त्याच बँकेचे नाव असलेले नोटांचे बडल आरोपीकडे सापडले आहे. चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी २८४०० रुपये व एक १२ हजार किमतीचा मोबाईल असा एकूण ४० हजार ४०० रुपये आरोपी कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीवर अडावद पोलीस ठाण्यात भाग ५ गु.र.न.३४/२० भा.दं.वि. कलम ४५७-३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीस चोपडा न्यायालयात हजर केले असता दि. १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास अडावद पो.स्टे.चे पीएसआय यादव भदाणे करीत आहेत.






