Pandharpur

पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी काम बंद व बोंबाबोंब आंदोलन करणार

पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी काम बंद व बोंबाबोंब आंदोलन करणार

प्रतिनिधी रफीक आत्तार

महाराष्ट्रातील नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचा-यांचे वेतनाची सहाय्यक अनुदानाची रक्कम दि.22/8/2020 म्हणजे गणपती उत्सवापूर्वी न मिळालेस दि.24/8/2020 पासुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी काम बंद व बोबांबोंब आंदोलन करणार आहेत.

सध्या करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव महाराष्ट्रत मोठया प्रमाणात वाढलेला असताना नगरपरिषदे मधील मुख्याधिकारी, सर्व विभाग प्रमुख, संवर्ग कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, मुकादम, शिपाई, सफाई कामगार हे शहरातील भाजी मार्केटमधील गर्दी रोखणे, किराणा व मेडीकल दुकानात होणारी गर्दी रोखणे, शहरात बाहेर गांवहुन आलेल्या व येणा-या लोकांची प्रत्येक घर ते घर जाऊन माहिती घेऊन सर्व्हे करणे व डॉक्टरांच्या साह्याने तपासणी करणे, दररोज ज्या घरांचा सर्व्हे झाला आहे अशा घरातील संशयीत बाधीत रूग्ण यांचेवर लक्ष ठेवण्याचे ही कामकरीत आहे. इतर शासकीय विभागातील 50% कर्मचारी शासनाच्या निर्देशानुसार कार्यरत आहेत परंतू नगरपरिषदेमधील सर्वच 100% कर्मचारी करोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम आपला जीव धोक्यात घालुन करीत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये नगरपरिषदेच्या सर्व कर्मचा-यांच्या वेतनासाठी देण्यात येणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम 1 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना देणे आवश्यक असताना अद्याप पर्यंत वेतनाची सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न मिळाल्याने महाराष्ट्रातील 339 नगरपालिका मधील कर्मचारी वेतनापासुन वंचित राहिले आहेत. दि.22/8/2020 रोजी गणेश उत्सव साजरा करण्य़ासाठी गणेश उत्सवापूर्वी कर्मचा-यांचे वेतन दि.22/8/2020 पूर्वी सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना न मिळाल्यास दि.24/8/2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा नगरपालिके समोर काम बंद करून बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button