फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय NAAC च्या तिसऱ्या सायकलला ३.२४ सी जी पी ए मिळवून अ श्रेणी प्राप्त करून परिसराचा नावलौकिक मिळवला आहे. NAAC च्या नवीन फ्रेमवर्क नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात धनाजी नाना महाविद्यालयाने सर्वाधिक ग्रेड मिळवली आहे.
याआधी २००४ मध्ये महाविद्यालयाला बी प्लस आणि २०११ मध्ये बी (२.९२ सी जी पी ए) ग्रेड मिळाली होती.
दरम्यान महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व कार्यकारी मंडळ, प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली
महाविद्यालयाने विविध बाबींमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे.
यासोबत विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन आणि स्टुडंट सपोर्ट यात महाविद्यालयाने प्रगती केलेली आहे.
यापुर्वी महाविद्यालयाने आय एस ओ २००८ आणि २०१५ मानांकन प्राप्त केले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमात दोनदा अ श्रेणी मिळवली आहे.
महाविद्यालयातील नॕक समिती समन्वयक उपप्राचार्य डॉक्टर उदय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य ए.आय.भंगाळे डॉ.आर पी महाजन डॉ. डी.ए.कुमावत डाॅ.ए.के.पाटील डॉ एस व्ही जाधव डॉ.नितिन चौधरी ,प्रा.राजेंद्र राजपूत ,प्रा.राकेश तळेले ,प्रा.हरिष नेमाडे ,प्रा.हरिष तळेले, प्रा.शिवाजी मगर यांनी काम पाहिले.
या उत्तुंग यशाबद्दल
तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष मा प्रा डॉ एस के चौधरी, उपाध्यक्ष मा श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन मा श्री लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा चेअरमन मा प्रा के आर चौधरी सचिव मा प्रा एम टी फिरके, सदस्य मा श्री मिलिंद वाघुळदे, मा प्रा पी एच राणे,
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, NAAC समन्वयक डॉ उदय जगताप, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक आणि परिश्रम घेतले. या यशाबद्दल परिसरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.





