कोरोनाच्या पार्शवभूमीवर गणेश मंडळांच्या भक्तांना रस्त्यावर मंडप ला परवानगी नाही
प्रतिनिधी रफीक आत्तार
सोलापूर ग्रामीण घटकात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व त्यांची एकूण संख्या ७००० पेक्षा जास्त झाली असून, आजपर्यंत २०५ लोक या रोगास बळी पडले आहेत, यामुळे सर्वांनी विविध प्रकारे जसे लॉकडाऊन, निबंध, अशा विविध मार्गाने कोरोना कमी करण्याचा प्रयत्न चालू केला यास यश येत आहे असे
दिसत आहे. येणारा गणेशोत्सव व इतर सण हे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर निबंध पाळून साजरा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मध्यवर्ती मंडळे व गणेश मंडळे, मुर्तीकार, यांचेशी विचार विनिमय व वरील शासन निर्णय, स्थानिक
कोरानाची परिस्थिती लक्षात घेता, सोलापूर शहर हद्दीमध्ये ज्याप्रमाणे सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामीण घटकातही खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:-
अ) मुर्ती खरेदी विषयक :-
१. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने श्रीगणेश मुर्ती ही शक्यतो ऑनलाईन बुक करावी अथवा मुर्तीकारांचे गोडाऊन, दुकान, कारखाना येथून किमान २ ते ३ दिवस आगोदर घेऊन जावी.
२. सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून किंवा रस्त्यावर श्री गणेश मुर्तीची विक्री करता येणार नाही.
३. घरगुती गणेश मुर्ती २ फुटापर्यंत व सार्वजनिक मुर्ती ४ फुटापर्यंत अथवा त्यापेक्षा लहान असावी.
ब)परवानगी विषयक:-
१. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेश स्थापनेस परवानगी देण्यात येणार नसल्यामुळे यावर्षी
कोणालाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी देण्यात येणार नाही.
२. सन-२०१९ मध्ये ज्यांनी परवानगी काढली असेल त्यांना सन २०२० -२०२१ मध्ये अर्ज केल्यावर
परिस्थितीनुरूप परवानगी देण्यात येईल.
३. गणेश मंडळांना डॉल्बी, बॅन्ड पथक, नाशिक ढोल, ढोली ताशा, झांज पथक, लेझिम पथक इत्यादी
अजिबात वापरता येणार नाही.
४. उत्सवाच्या अनुषंगाने कोणालाही होर्डीग, बॅनर, पोस्टर इत्यादी लावण्यासाठी परवानगी असणार नाही.
क) ठिकाण व स्थापना विषयक :-
१. मंडळांना सार्वजनिक ठिकाणी, चौकात, रस्त्यावर मंडप घालून गणेशमुर्तीची स्थापना करण्यास परवानगी
नाही.
२. जेथे श्रीगणेश मंदीरे आहेत किंवा कायमस्वरूपी मुर्ती ठेवलेली आहे, त्याठिकाणी स्थापना करता येईल.
तथापि, कोणत्याही प्रकारचे स्टेज, मंडप उभारता येणार नाही.
३. घरगुती किंवा पक्के बांधकात असलेल्या ठिकाणी श्री गणेश मुर्तीची स्थापना करता येईल.
ड) आरतीची वेळ विषयक :-
१. श्रीगणेशाचे सकाळी व सांयकाळचे आरती व पुजेस जास्तीत जास्त १० किंवा त्यापेक्षा कमी इसमांना Social Distancing चे पालन करून उपस्थित राहता येईल, त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
२. आरतीसाठी एकाच वेळी एकत्र येण्यापेक्षा सकाळची आरती कांही पदाधिकारी यांनी करावी व सायंकाळची आरती काही पदाधिकारी यांनी करावी.
३. श्रींच्या आरतीसाठी सकाळी ०७.०० वा. ते १०.०० वा. व सायंकाळी ०६.०० वा. ते ०९.०० वा. या वेळेमध्ये
बेसविरहित दोन छोटे (२ ४३ फुटाचे) स्पिकरचे बॉक्स वापरता येतील. तथापि, याबाबत संबंधित विभागाचे
उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
इ) श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन विषयक :-
१. घरगुती अथवा सार्वजनिक श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन हे आपल्या घरीच अथवा स्थापन केलेल्या ठिकाणी
करण्यात यावे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी विर्सजनास परवानगी असणार नाही.
ई) मिरवणूक विषयक :-
१. श्रींच्या अगमन, स्थापना, विसर्जन इत्यादीसाठी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही.कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य पर्यावरण, वैदयकीय, शिक्षण विभाग, तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्दी झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.






