फैजपूर

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टआयोजित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टआयोजित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टआयोजित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
     शिक्षकांनी समोरचा विद्यार्थी स्वतःचे मूल समजून जर शिकवले तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतील. बालवयात विद्यार्थ्यांना दिलेली चांगली वागणूक ते आयुष्यभर स्मरणात ठेवतील. विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडवित असतांना आपण त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे व मै हू ना… हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डीआयइसीपीडी चे प्रभारी प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त केले. येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रावेर यावल तालुक्यातील 23 शाळांमधील ४६ शिक्षकांचा सन्मानपत्र, शाल,  मोत्याची माळ, पेन, पुस्तक व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर पपू गोपाल चैतन्य जी महाराज वृंदावन धाम पाल, महंत महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, पपू सुरेश शास्त्री मानेकर बाबा, संत श्री शिवमदासजी महाराज नासिक, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन जळगाव, सय्यद अल्ताफ अली तसेच स्वतः हून हजर असलेले शिक्षण प्रेमी नामदार हरिभाऊ जावळे व्यासपीठावर उपस्थित होते.  सतपंथ चारीटेबल ट्रस्टने विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कारासाठी जी निवड प्रक्रिया राबविली ती अत्यंत पारदर्शक विश्वसनीय असल्याचे सांगत शासकीय पुरस्कार निवडीत सुद्धा या पद्धतीचा अवलंब करणे विषयीचा विधिमंडळात प्रश्न मांडणार असल्याचे नामदार हरिभाऊ जावळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय असून भविष्यात नक्कीच शिक्षकांना ऊर्जादायी असा आहे. अध्यात्मिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राला परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज जे योगदान देत आहे त्यातून नवीन समाज निर्मितीला नक्कीच हातभार लागण्यास मदत होईल असे व्यासपीठावरील उपस्थित संतांनी सांगत पुरस्कारार्थीना शुभेच्छा व आशीर्वाद दिल्या.  पुरस्कार मिळाल्याने झालेल्या आनंदाबरोबरच कर्तव्य व जबाबदारीची जाणीवही त्यांनी करून दिली कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात बोलताना महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी विद्यार्थ्‍यांना ठामपणे सत्य बोलण्यात शिकवून शिक्षकांनी आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांवरती संस्कार घडवावेत तसेच या बालवयातच त्यांना वृक्षलागवड, जलबचत, स्वच्छता हे महत्वपूर्ण संस्कार दिल्यास सुदृढ राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली. हा पुरस्कार विद्यार्थ्यांनीच आपल्या प्रिय शिक्षकांना दिलेला असून सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट केवळ माध्यम आहे. या प्रथम व प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या  उपक्रमाची यशस्विता पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणावर ठिक ठिक-ठिकाणी हा  उपक्रम राबवून शिक्षकांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊ असा मानसही महाराजांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.  पुरस्कारार्थीनी उत्तर देताना सांगितले की, या पुरस्कारासाठी आपण धडपड केली नाही तर पुरस्कार आपल्या कार्याची दखल घेऊन मिळाला म्हणून हा पुरस्कार आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असून हा कार्यक्रम ऊर्जादायी व नवनवीन कार्य करण्यास प्रेरक आहे. विशेष म्हणजे आमच्या कुटुंब व मित्रमंडळी सह असा सन्मान आम्ही पहिल्यांदाच अनुभवला असून आदल्या दिवशी रात्री दहा वाजता महाराजांनी केलेल्या प्रत्येकाला फोन म्हणजे खऱ्या अर्थाने आमचा खूप मोठा सन्मान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र  महाजन तसेच आभार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मानले. विद्यार्थीप्रिय पुरस्कार प्राप्त  शिक्षक / शिक्षिका यांची नावे—
१)शारदा माध्यमिक विद्यालय, न्हावी श्री.युवराज निंबा तळेले, श्री.नरेद्र रामा चौधरी २)श्री.ग.गो.बेंडाळे विद्यालय, विवरा सबाजखाँ नवाब तडवी, सौ.नीलिमा हेमंत नेमाडे ३)कुसुमताई मधुकरराव चौ.माध्य.विद्या.फैजपूर श्री.ललित जयराम बोंडे, श्री.विनीत अनिल बोंडे ४)नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल श्री.जी.बी.निळे, श्री.गिरीश भानुदास चोपडे ५)एल.एम.पाटील विद्यालय, राजोरा श्री.घनश्याम सुकदेव साळुंके, श्री.गिरीश लालजी पाटील ६)डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा श्री.विनोद विष्णू चव्हाण, श्री.जगदीश नारायण धांडे ७)फातिमा उर्दू हायस्कूल, फैजपूर समीर बेग सलीम बेग, शकीला बानो रशीद खान ८)म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूर श्रीमती हसीना जी. तडवी, श्रीमती अनिता बी. राजपूत ९)खिजर उर्दू हायस्कूल, चिनावल अब्दुल बसित रहेमान खान, तोसीफ अहमद खान इब्राहीम खान १०)आ.ग.म. विद्यालय सावदा श्री.पंकज जे. पाटील, श्री.संजय महाजन ११)शकुंतला जे. माध्यमिक विद्यालय, फैजपूर श्री.सदाशिव दत्तू कापले, श्री.अजय प्रभाकर महाजन १२)जे.टी.महाजन इंग्लिश/सेमी इंग्लिश मि. स्कूल, फैजपूर श्री.परेश प्रदीप चौधरी, श्री.मिलिंद कानडे १३)मौलाना उर्दू हायस्कूल (मुलांचे) (मुलींचे) फैजपूर शफिक रफिक खाटीक, 
 अजमल खान फजलू रहेमान खान 
१४)घ.का.विद्यालय, आमोदे श्री.संजीव बाबुराव बोठे, श्री.ललित पंडित पिंपरकर १५)श्री.स्वामीनारायण गुरुकुल, सावदा दीपमाला राधेशाम दाणी, श्री.संतोष दामोदर पाटील १६)लोक विद्यालय, पाडळसे सौ.मनीषा सुखदेव सावकारे, श्री.संजय लीलाधर पाटील 
१७)प्रकाश विद्यालय, मोठे वाघोदा श्री.विनोद बाळ बाऱ्हे, श्री.वैभव मुरलीधर चौधरी १८)विष्णू हरी पाटील कन्या शाळा, सावदा सौ.दिपाली रमेश चौधरी, सौ.निर्मला रेवानंद बेंडाळे  १९)भारत विद्यालय, न्हावी सौ.दिपाली लीलाधर पाटील, श्री.प्रविण वासुदेव पाटील २०)नूतन माध्य. विद्यालय, अंजाळे सुनील शिवदास सोनवणे, श्री उल्हास अरविंद पाटील २१) सुज्ञा अरुण महाजन माध्यमिक विद्यालय , वढोदा-प्र.सावदा सौ.हेमलता दिनेश किरंगे, श्री.मुकेश तांबट २२)ज्योती विद्या मंदीर, सांगवी श्री.आर.डी.वायकोळे, श्री.एम.एस.भटकर २३)झि.तो.महाजन व ना.भा.पाटील ज्यू.कॉलेज, धानोरा श्री.देविदास हिरामण महाजन, श्री.वासुदेव सुकदेव महाजन.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button