आमदार राजू भोळे यांची चोपडा उप जिल्हा रुग्णालय कोव्हिडं सेंटर ला आकस्मिक भेट
चोपडा लतीश जैन
तालुक्यात व शहरात दिवसे दिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या हा अतिशय चिंतेचा विषय झालेने जळगांव भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश दामू (राजू मामा ) भोळे यांनी उप जिल्हा रुग्णालय कोव्हिडं सेंटर ला आकस्मिक भेट दिली.
या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज पाटील व तहसीलदार अनिल गावित यांचे कडून वस्तुस्थिती जाणून घेऊन, कोरोना विषाणू मुळे 15 ऑगस्ट पर्यत जागतिक आरोग्य संस्थेने सर्वत्र रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केल्या मुळे भविष्यात तशी गरज भासल्यास क्वारांटाईन रुग्णाचे बेडची व्यवस्था कशी व कोठे करणार या बाबत माहिती जाणून घेतली.
तहसीलदारांना चोपडा केंद्रावरील मका खरेदीत झालेल्या कथित प्रकाराने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत असल्याची जाणीव करून देऊन सहाय्यक निबंधक यांचे चौकशी अहवाल नुसार संबंधितावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी सूचनाही केली. तसेच सी सी एफ कडून उर्वरित शेतकऱ्याचा कापूस तात्काळ खरेदी करणे बाबतही कार्यवाही सत्वर करण्यात यावी व शेतकऱ्यां वरील अन्याय दूर करण्याच्या सूचना दिल्यात.
या वेळी माजी महापौर विष्णू भंगाळे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख अशोक राठी, तालुकाअध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील , कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, व्यापारी आघाडी अध्यक्ष हेमंतजोहरी, ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश चौधरी, माजी सरचिटणीस दिपक बाविस्कर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस रितेश शिंपी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






