Chopda

नववी दहावी सह बारावीच्या विद्यार्थ्यांना ही मोफत लेखन साहित्य व पाठयपुस्तके मोफत पुरवा. भाजपा चे तहसीलदारांना निवेदन

नववी दहावी सह बारावीच्या विद्यार्थ्यांना ही मोफत लेखन साहित्य व पाठयपुस्तके मोफत पुरवा. भाजपा चे तहसीलदारांना निवेदन

चोपडा लतीश जैन

कोरोना महामारी मुळे मजुरांचे हातचे काम गेले तर निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे , वारववर शेतकऱ्यावर आपत्ती कोसल्या मूळे त्याना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कुटुंम्बाचे पालन पोषण, मुलांच्या शैक्षणीक गरजा कश्या पूर्ण कराव्यात हा यक्ष प्रश्न त्यांचे पुढे आज आवासुन उभा आहे. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सत्र 2020 – 2021साठी पाठयपुस्तक व लेखन साहित्य मोफत पुरवठा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रकाश लक्ष्मण पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, यांचे हस्ते निवेदन देण्यात आले.

सदरनिवेदनावर भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष पंकज भाऊ पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, माजी तालुका प्रमुख व पं स सभापती आत्मारामभाऊ म्हाळके, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधान सभा क्षेत्रप्रमुख प्रदीपभाऊ पाटील, जिल्हापरिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, औद्योगिक वसाहत चेअरमन तथा माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष देविदास (देवाबापू )पाटील , विठ्ठल पाटील, लक्ष्मण माळी, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस गणेश पाटील भरतसोनगिरे , अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष राज घोगरे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस रितेश शिंपी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करताना सर्व उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button