शास्त्रज्ञाकडून केळी बागेची पाहणी
रावेर प्रतिनिधी सलीम पिंजारी
पाल येथील कृषी विज्ञान केंद्र मार्फत रावेर तालुक्यातील खिरोदा,सवखेडा,
उटखेडा,चिनावल,कुंभार खेड भागात केळी पिकावर आलेल्या रोगग्रस्त बागांची पाहणी करण्यात आली.जुलै महिन्यात कंद पासून लागवड केलेल्या व ऊती सांवर्धित रोपांवर 45 % पर्यंत सी एम व्ही रोगाची लागण झालेली पाहणी नंतर आढळून आलेली आहे.कुकुंबर मोझेक व्हायरस या विषाणू जन्य रोगाची लागण झाली असून त्याचा प्रसार प्रादुर्भाव युक्त कंदापासून तयार केलेल्या ऊती संवर्धित रोपे व कंद पासून होतो तसेच कापूस पिकावरील मावा कीड व्दारे या रोगाच्या विषाणूचे वहन होते.एकदा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रण साठी त्यावर कोणताही ठोस उपाय करता येत नसल्याने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी
१. केळी बाग स्वछ ठेवणे २.प्रादुर्भाव ग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी तसेच बागेचे 2 ते 3 वेळेस 4 ते 5 दिवसाच्या अंतराने निरीक्षण करून रोग ग्रस्त झाडांची विल्हेवाट लावावी
२.केळी बागेत तण विशेषतः चिवई ची भाजी काढून टाकावी
३.मिरची,वांगी व काकडी वर्गीय पिकांची केळी बागेत लागवड करू नये
४.मावा या वाहक किडीच्या नियंत्रण करण्यासाठी डायमेथोइट 30 इसी 20 मिली किंवा थायो मिथोकझाइम 25 डँब्लु जी 2 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 5 मिली या किडनाशकांची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
अश्या उपाययोजना करण्याबाबत क्षेत्र भेट प्रसंगी केळी उत्पादकांना मार्गदर्शन करतांना श्री.महेश महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण,के व्ही के,पाल) यांनी सांगितले. खिरोदा, चिनावल,उतखेडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र पाल येथे संपर्क करण्याचे आवाहनही केले.या क्षेत्र भेट प्रसंगी श्री.सुधाकर झोपे,श्री.ललित चौधरी, देवेंद्र पाटील,सुहास सरोदे,अशोक चौधरी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.







