Pandharpur

वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर वर तालुका पोलिसांची कारवाई

वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर वर तालुका पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील सरकोली हद्दीत पंढरपूर पोलिसांनी केले वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई या कारवाईमध्ये ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉली पाच ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून सुमारे चोवीस लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर तालुका पोलिस पथकातील बापूसाहेब मोरे यांना सरकोली गावच्या हद्दीत भरदिवसा अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती खबर्‍या मार्फत मिळाली त्यांनी आपले साथीदारांना घेऊन खाजगी वाहने रांजणी, आंबे मार्गे मौजे सरकोली शिवारातील देशमुख पाटी ते खटकाळवस्ती असे रोडने जात असताना समीर इनामदार यांचे घरासमोर आले असता समोरून एकामागे एक असे पाच ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉली सह येत असल्याचे दिसले. खबऱ्याच्या दिलेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता त्या ट्रॅक्टर चालकांनी त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर जागीच थांबवून पळून जाऊ लागली यावेळी पोलिसांनी पाठलाग करून सोमोरील दोन ट्रॅक्टरचे चालक यांना पकडले तर पाठीमागे तीन ट्रॅक्टरचे चालकांना पाठलाग केला असता ते मिळून आले नाही फरार झाले. ट्रॅक्टर मध्ये काय आहे असे विचारले असता वाळू असल्याचे सांगितले त्यांचे कडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे का याबाबत विचारले असता आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावेळेस ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४५/ एफ ६३८२ यास बिगर नंबरचे डम्पिंग ट्रॉली चालक दिगंबर तानाजी कराळे असे सांगितले असून दुसरा एम एच १३/ एजे ००८० यासही बिगर नंबरची डम्पिंग ट्रॉली व चालकाचे नाव सुभाष रामचंद्र नवले असल्याचे सांगितले दरम्यान एम एच १३/ एजे ०७३६, एम एच १३/ एजे ५२३६, एम एच १३/ सी एस ५७७० हे तिन ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून त्यांचे चालक अनुक्रमे बाहुबली शरद भालेराव, नितीन पोपट भोसले, संदीप सुरेश हावळे अशी असून ते सर्व फरार झाले आहे ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. पाच ट्रॅक्‍टर ट्रॉली व पाच ब्रास वाळू असा २४ लाख ३० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सागर कवडे व पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरील सर्व ट्रॅक्टर चालक मालक यांच्यावर भादवि कलम ३७९,३४ पर्यावरण कायदा कलम ९,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button