पंढरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर हमीद बागवान यांचा पंढरपुर शहर पोलिस स्टेशन तर्फे सन्मान
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपुर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा कोविड वारियर्स जुबेर हमीद बागवान यांनी गेल्या दोन ते तिन महिन्यापासून covid 19 कोरोना या महाभयानक रोगराई विषयी तळागाळात जाऊन तेथील जनतेला कोरोना विषयी माहिती व जनजागृती आणि त्या पासून बचाव कसा करायचा त्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील याची माहिती जनतेला दिली तसेच कोरोना या संकटाच्या पार्श्वभुमिवर रक्ताचि टंचाई टाळनेसाठी रक्तदानाचे शिबीराचे आयोजन तसेच आपापल्या गावी पायी जानार्या बांधवांना फळ वाटप पीण्याच्या पाण्याची व्यवस्था जनतेमध्ये सिनेटायझर मास्क गावात व परिसरात वाटण्याचे त्यांनी काम केले आहेत.व आषाढी यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी दक्ष राहुन काम करत असल्याबद्दल त्यांचे सामाजिक कार्य पाहून अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सर व पंढरपुर उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे सर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळेस पंढरपुर पोलिस निरीक्षक अरुण पवार सर,दयानंद गावडे सर,एपीआय गायकवाड सर, दामिनी पथकच्या कुसुम क्षीरसागर मॅडम डॉ.संगिता पाटील मॅडम,सामाजिक कार्यकर्ते जन्नत अॅक्वा चे ओनर समीर हाजी नजीर बागवान व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.व सर्व सन्माननीय मान्यवरांनी पुढील सामाजिक कार्यास जुबेर हमीद बागवान यांना शुभेच्छा दिल्या.






