शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अन्यथा अंदोलन , शिवसेनेचे जिल्हा संघटक मेघराज पाटील यांचा इशारा
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.२३
शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे नागरिकांवर महामारीचा धोका निर्माण झाला असुन यावर तात्काळ उपाय योजना करावी अन्यथा तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक मेघराज पाटील यांनी निवेदना द्वारे दिला आहे .
जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरातील सर्व कचरा हा भोत्रा रोडवरील जागेत टाकला जातो. त्या ठीकाणी गांडुळ खत निर्मिती व घनकचरा विघटन करून त्याठीकाणी खत निर्मिती व्हायला पाहीजे होती परंतु तिथे आणलेला सर्व कचरा जसाच्या तसा टाकला जातो आणि तो पेटवून दिला जातो .
त्यामधे प्रामुख्याने प्लास्टीक चे प्रमाण जास्त असल्यामुळे निसर्गाचा र्हास होऊन प्रदुषणात कमालीची वाढ झाल्यामुळे तेथिल नागरिकांच्या आरोग्यावर भयानक परिणाम दिसत आहेत. कचरा पेटविल्यामुळे आग भडकते परंतु आग संपेपर्यंत कोणीही कर्मचारी किंवा ठेकेदार त्या ठिकाणी थांबत नाहीत, ठिणग्या उडून शेजारील शेतातील पीक, चारा, झाडे व कडब्याच्या गंजी भडकलेल्या आगीत जळतात, त्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. या परिसरातील वस्ती तसेच जनावरांचे गोठे यांना आगीचा धोका संभावतो. मात्र परंडा नगरपरिषद निष्काळजीपणा करते. तसेच त्याठीकाणी मेलेली जनावरे व चिकन शाॅप वरिल कोंबड्यांची अवयव टाकल्यामुळे दुर्गंधी बरोबरच मोकाट कुत्रांचा पण भयानक त्रास तेथिल नागरिकांना व शेतकरयांना होत आहे. परंडा नगरपरिषद च्या मुख्याधिकारयांना वारंवार विनंती करून सुध्दा तिथे कसलिही सुधारणा होताना दिसत नाही. शासनाचे लाखो रुपये खर्च होऊन सुध्दा गांडुळ खत व घनकचरयाचे नियोजन होत नसुन उलट त्याचा नागरिकांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या देश कोरोना सारख्या भयानक रोगाशी झगडत असताना आणि सर्वत्र स्वच्छतेचे आवाहन करित असताना परंडा नगरपरिषद मात्र त्यास हरताळ फासुन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे तसेच या कचऱ्या पासुन बरेच आजार बळावण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
तरी मे.साहेबांनी जनतेला होणाऱ्या आरोग्या विषयीच्या त्रासावर लक्ष घालुन तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
अन्यथा आम्हाला आमच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्यास सर्वस्वी परंडा नगरपरिषद जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे .
निवेदनाच्या प्रति आमदार तानाजीराव सावंत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,तहसिलदार परंडा मुख्याधिकारी नगरपरिषद परंडा यांना देण्यात आल्याआहेत .






