लोटस इंग्लिश स्कूलमध्ये प्रथमच ऑनलाईन वेबीनारचे आयोजन
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर -कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. तब्बल तीन तासाच्या या ऑनलाईन वेबिनारमध्ये सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ट्रेनिंग ऑन लीडरशिप अँड इन्व्हेंशन टीचिंग प्रॅक्टिस या विषयावर स्कूल फॉर ऑलचे संस्थापक डॉ.सुरजित शहा. राशी राधा यांनी तब्बल तीन तास प्रशिक्षण दिले. या वेळी लोटस स्कूलचे सर्व शिक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या डॉ. शहा यांनी ‘लिडरशिप व इनोव्हेटीव टिचींग प्रॅक्टिसेस’ या विषयी बोलताना शिक्षकांना शिकविताना आणि विद्यार्थ्यांना शिकताना येणाऱ्या समस्याविषयी माहिती दिली. एवढेच नाही तर शिक्षकांना नविन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करावे’ असे सांगितले. तसेच फ्युचर टेक्नॉलॉजीचा वापर करुन अध्यापन कसे करता येईल या विषयी माहिती दिली.
यावेळी लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी स्कूल मध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक अक्षय रुपनर, हदयनाथ नामदे,अर्जन जगन्नाथ, शिक्षिका हिना मुलानी, समिना मुलाणी,सरस्वती गोरे यांनी ऑनलाइन वेबीनारमध्ये चर्चा केली.या वैशिष्टयेपर ऑनलाईन वेबीनार उपक्रमाचे प्रथमच स्कूलने आयोजन केल्याने संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी.डी. रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी स्कूलच्या प्रिसिपल डॉ. जयश्री चव्हाण व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.






